
Buldhana drought crop damage
जिल्ह्यात ७ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. सोयाबीन, कपाशी, मका, तूर, ज्वारी इत्यादी प्रमुख पिके आहेत. कपाशी आणि सोयाबीनचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक आहे. सोयाबीनसारख्या नगदी पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला असून, जिल्ह्यातील शेती कोरडवाहू आणि निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. त्यातच गत दीड महिन्यापासून दडी मारून बसलेला पाऊस, कीटकांचा वाढता प्रादुर्भाव आणि कीटकनाशकांचे वाढते दर यामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे.