Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: वीजजोडणीसाठी ग्रामस्थांचा पंचायत समितीत ठिय्या; ८ दिवसांत होणार पाणीपुरवठा, लेखी आश्वासनाने आंदोलन मागे

Buldhana Adgaon Raja Water Crisis: आडगाव राजा येथे वीजजोडणीअभावी पाणीपुरवठा रखडल्याने ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. अखेर आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 08, 2026 | 06:04 PM
Buldhana Adgaon Raja Water Crisis

Buldhana Adgaon Raja Water Crisis

Follow Us
Follow Us:
  • आडगाव राजात पाणीटंचाईचा भडका
  • वीजजोडणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
  • प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम
बुलढाणा: राजे लखुजीराव जाधव यांची जन्मभूमी असलेल्या आडगाव राजा येथे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला. पिंपरखेड बुद्रुक येथील धरणातून गावातील विहिरीपर्यंत जलवाहिनी टाकूनही केवळ वीजजोडणीअभावी पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. वर्षभरापासून प्रशासनाकडून आश्वासनांचीच पुनरावृत्ती होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. अखेर ८ दिवसात पाणीपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा

मागीलवर्षी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित आमसभेत ग्रामस्थांनी गावातील पाणीप्रश्न मांडला होता. त्यावेळी प्रशासनाने ८ दिवसात पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तब्बल वर्ष उलटूनही हे आश्वासन पूर्ण झाले नाही. दरम्यान, धरणातून विहिरीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले. परंतु, वीजजोडणीचे काम रखडल्याने संपूर्ण योजना अडगळीत पडली. पाण्याची व्यवस्था होऊनही केवळ वीजजोडणीअभावी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यावेळी गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी ८ दिवसात पाणीपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात युवा नेते प्रदीप बिल्होरे, रामदास कहाळे, प्रकाश सोनुने, अतिशराजे जाधव, रुस्तुमराव झोरे, श्याम काळे, गैबी राठोड, संजय शेवाळे, संजय कहाळे आदींची उपस्थिती होती.

गावकऱ्यांनी प्रशासनाला विचारला जाब

प्रशासनाच्या या दिरंगाईकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी ३० ऑक्टोबर रोजी निवेदन दिले होते. सोमवार पयत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, तरीही प्रश्न मार्गी न लागल्याने संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती गाठून प्रशासनाला जाब विचारला.

पाणीटंचाईमुळे आडगाव राजा येथील नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही वीजजोडणीअभावी योजना बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे. आता प्रशासनाने दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत पाणीपुरवठा सुरू न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याची शक्यता आहे.

Washim: नाकाबंदीत पोलिसांच्या जाळ्यात चोर अडकला! चोरीची दुचाकी जप्त; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

💡

Frequently Asked Questions

  • Que: आडगाव राजा येथे पाणीटंचाईचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: पिंपरखेड बुद्रुक येथील धरणातून गावातील विहिरीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, वीजजोडणीअभावी पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.

  • Que: आडगाव राजा येथील ग्रामस्थांनी आंदोलन का केले?

    Ans: वर्षभरापासून प्रशासनाकडून आश्वासने मिळत असूनही पाणीपुरवठा सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

  • Que: प्रशासनाने ग्रामस्थांना काय आश्वासन दिले?

    Ans: गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले.

Web Title: Buldhana adgaon raja water crisis villagers protest electricity connection pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • Agricultural Commodities
  • buldhana news
  • electric current
  • Water Shortage
  • Water supply

संबंधित बातम्या

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा
1

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा

Washim News: २४७ गावांना पाणीटंचाईचा धोका; दुष्काळमुक्तीसाठी ‘सीएसआर’चे बळ, जलसंधारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कंपन्यांना आवाहन
2

Washim News: २४७ गावांना पाणीटंचाईचा धोका; दुष्काळमुक्तीसाठी ‘सीएसआर’चे बळ, जलसंधारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कंपन्यांना आवाहन

Buldhana News: दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा द्या; पालकमंत्री मकरंद जाधव पाटलांचे प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश
3

Buldhana News: दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा द्या; पालकमंत्री मकरंद जाधव पाटलांचे प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश

 Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू
4

 Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.