Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: २४७ गावांना पाणीटंचाईचा धोका; दुष्काळमुक्तीसाठी ‘सीएसआर’चे बळ, जलसंधारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कंपन्यांना आवाहन

Washim Yogesh Kumbhejkar on Water Conservation Projects: वाशिम जिल्ह्यातील २४७ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 07, 2026 | 09:54 PM
Yogesh Kumbhejkar on Water Conservation

Yogesh Kumbhejkar on Water Conservation

Follow Us
Follow Us:
  • वाशिममध्ये पाणीटंचाईचे संकट गडद
  • जलसंधारणासाठी सीएसआर कंपन्यांना साद
  • पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठा आराखडा
वाशिम: जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासोबतच स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीअंतर्गत कार्यरत कंपन्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. काटेपूर्णा सभागृहात स्वयंसेवी संस्था व सीएसआर भागीदारांच्या बैठकीत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मृद व जलसंधारण अभियंता हरेंद्र वाघमारे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, डॉ. हरिष बाहेती, अविनाश मारशेटवार, दीपा वानखेडे, डॉ. अर्चना मेहकर, वृषाली टेकाळे, अॅड भारती सोमाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती. (Washim News)

Buldhana News: दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा द्या; पालकमंत्री मकरंद जाधव पाटलांचे प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश

मृद व जलसंधारण विभागातर्फे प्रस्तावित कामांचे नियोजन व आवश्यक निधीची माहिती. वाघमारे यांनी सादर केली. जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान ४८५.७८ मि. मी. पाऊस झाला असून, पावसाची तूट ३७.३७ टक्के आहे. त्यामुळे ७९ पैकी ७७ निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीत सरासरी १.११ मीटरने घट झाली आहे. जिल्ह्यातील २४७ गावांमध्ये तीन टप्प्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांची क्षमता वाढविणे आणि भूजल पुनर्भरणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे.

‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ – ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’  योजना

जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ आणि ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजना राबविण्यात येत आहेत. स्वयंसेवी संस्था व सीएसआर भागीदारांना यंत्रसामग्री आणि इंधन, गाळ उपसा, जनजागृती, प्रकल्प अहवाल व पात्र शेतकऱ्यांना गाळाचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करता येणार आहे.

गाळ उपशासाठी यंत्रसामग्री व इंधन खर्चापोटी प्रति घनमीटर ३१ रुपये दर निश्चित करण्यात आला. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना गाळ वाहतुकीसाठी प्रति घनमीटर ३५.७५ रुपये अनुदान देय आहे. यासाठी एकरी १५ हजार रुपये आणि कमाल अडीच एकर क्षेत्रापर्यंत लाभाची तरतूद आहे. नाला खोलीकरणातील गाळ वाहतुकीसाठी मात्र खर्च देय नाही.

स्वयंसेवी संस्थांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेतील समितीमार्फत होईल. संस्था नोंदणीकृत, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण, पुरेसे मनुष्यबळ तसेच सनियंत्रण व मूल्यांकनाचा अनुभव असणे आवश्यक आहे. कामांचे जिओटॅगिंग, कामापूर्वी व कामानंतरची छायाचित्रे, दैनंदिन गाळ उपसा आणि यंत्रसामग्रीच्या कामकाजाची नोंद ‘अवनी ग्रामीण अॅप’वर करण्यात येणार आहे.

संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रानुसार तालुका व जलसाठ्यांची निवड करून यंत्रसामग्री अथवा सिएसआर निधीच्या स्वरूपात सहभाग नोंदवावा. संस्थेचा परिचय, नोंदणी तपशील, पूर्वी केलेल्या कामांची माहिती आणि वाशिम जिल्ह्यासाठी प्रस्तावित कृती आराखडा मृद व जलसंधारण विभागाकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी यावेळी केले.

सिमेंट साठवण बंधाऱ्यांचा समावेश

प्रस्तावित आराखड्यात तलावांमधून गाळ काढण्याची १७४ कामे, नाला खोलीकरण व रुंदीकरणाची १७६ कामे आणि ५ सिमेंट साठवण बंधाऱ्यांचा समावेश आहे. तलावांमधून सुमारे ३२.५ लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन असून, त्यातून अंदाजे ८ हजार १०० एकर शेतजमिनीला सुपीक गाळ उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच तलावांची सुमारे ३.२५ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता पुनस्र्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे.

Farmer News: रब्बी हंगाम पीकविम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत; गहू, हरभरा, कांदा पिकाचा समावेश, कृषी विभागाचे आवाहन

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाशिम जिल्ह्यात किती गावांना पाणीटंचाईचा धोका आहे?

    Ans: वाशिम जिल्ह्यातील २४७ गावांमध्ये तीन टप्प्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • Que: वाशिम जिल्ह्यात यंदा पावसाची किती तूट नोंदवण्यात आली?

    Ans: जून ते सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात ४८५.७८ मिमी पाऊस झाला असून, पावसाची तूट ३७.३७ टक्के आहे.

  • Que: जलसंधारणासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कोणते आवाहन केले?

    Ans: पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि सीएसआर कंपन्यांनी जलसंधारणाच्या कामांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन कुंभेजकर यांनी केले.

Web Title: Washim yogesh kumbhejkar on water scarcity csr water conservation pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 09:54 PM

Topics:  

  • Washim news
  • Water scarcity
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Washim: ‘व्हीबी- जी राम’जी योजनेत कामांना चालना द्या, जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश; देखरेख समितीची बैठक
1

Washim: ‘व्हीबी- जी राम’जी योजनेत कामांना चालना द्या, जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश; देखरेख समितीची बैठक

माण तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; खरीप वाया गेला, रब्बी हंगाम धोक्यात
2

माण तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; खरीप वाया गेला, रब्बी हंगाम धोक्यात

Washim: नाकाबंदीत पोलिसांच्या जाळ्यात चोर अडकला! चोरीची दुचाकी जप्त; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
3

Washim: नाकाबंदीत पोलिसांच्या जाळ्यात चोर अडकला! चोरीची दुचाकी जप्त; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

Karanja: दुष्काळी परिस्थितीसाठी प्रशासनाने सज्ज रहावे; आमदार सई डहाके यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
4

Karanja: दुष्काळी परिस्थितीसाठी प्रशासनाने सज्ज रहावे; आमदार सई डहाके यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.