
Makarand Jadhav Patil on Buldhana Drought
यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आ. श्वेता महाले, आ. सिद्धार्थ खरात, आ. मनोज कायंदे ऑनलाइन सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आ. संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण, पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह जलसंधारण, कृषी, मृद व जलसंधारण आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५९ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. उर्वरित पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवर आर्थिक संकट अधिक गडद होऊ नये, यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली करू नये, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले. महसूल आणि कृषी विभागाने समन्वयातून काम करून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ सुलभतेने मिळवून द्यावा. शासनाने ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी पशुसंवर्धन आणि कृषी विभागाने आतापासूनच नियोजन करावे, शेतकऱ्यांना चारा लागवड आणि चारा उत्पादनासाठी प्रोत्साहित करावे. जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच वनक्षेत्रात वणवे लागू नयेत, यासाठी वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
Ans: प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत, आणि योजनांचा लाभ तातडीने द्यावा, असे निर्देश पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले.
Ans: जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५९ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.
Ans: दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढू नये, यासाठी कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली करू नये, असे निर्देश त्यांनी दिले.