Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: जिल्हा बँक निवडणुकीचा फैसला; ९४ टक्के मतदान; अनेक मान्यवरांनी बजावला आपला मताधिकार

Buldhana DCC Bank Election: बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या उर्वरित ९ संचालकपदांसाठी रविवारी झालेल्या मतदानात तब्बल ९२ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. १२ जागा आधीच बिनविरोध झाल्याने सहकार पॅनलचे पारडे जड असले तरी शेतकरी परिवर्तन पॅनलच्या आव्हानामुळे निकालातून कोणती राजकीय समीकरणे बदलणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 24, 2026 | 06:29 PM
Buldhana DCC Bank Election

Buldhana DCC Bank Election

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा बँक निवडणुकीचा फैसला
  • ९४ टक्के मतदान
  • अनेक मान्यवरांनी बजावला आपला मताधिकार
बुलढाणा: जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदांच्या २१ पैकी उर्वरित ९ जागांसाठी रविवार मतदान प्रक्रिया पार पडली. या आधी ‘सहकार पॅनल’ च्या १२ जागांची बिनविरोध वर्णी लागली असल्याने सत्तासंपादनासाठीच्या बहुमताचे गणीत याआधीच जुळलेले दिसत असले तरी जिल्हावासियांचे लक्ष वेधल्या गेले आहे. ते सहकार पॅनल विरुद्ध स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलमध्ये उर्वरित ९ जागांसाठी झालेल्या लढतीमध्ये कोणाचे पारडे जड ठरले, हे आजच्या निकालाहुन स्पष्ट होणार असल्याने निकालाकडे लक्ष लागले आहे. सायंकाळी ५ वाजतापर्यंत चाललेल्या या मतदान प्रक्रियेत ९२ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक अंदाजानुसार माहिती सूत्राकडून प्राप्त झाली.

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई

काही समीकरणे बदलू शकतील का? असे अनेकांना वाटत आहे. ‘सहकार पॅनल’ आठ जागा, ‘शेतकरी परिवर्तन पॅनल’ ७ जागा आणि स्वतंत्र उमेदवार ८ जागा, असे एकूण २३ उमेदवार दिसत असले तरी यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतली असल्याने खऱ्या अर्थाने २१ उमेदवारांतच लढत होत आहे. ७ जागांच्या माध्यमातून सहकार पॅनलपुढे आव्हान उभे करणाऱ्या ‘शेतकरी परिवर्तन पॅनल’ची या निवडणुकीत जोरदार चर्चा होत आहे. आपल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सहकार पॅनलकडून डावलल्याचा धक्का राष्ट्रवादीला नामांकन वापस घेण्याच्या मुदती अखेर बसला. पण, तात्काळ सावरत ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ आकाराला आणून सहकार पॅनललाच अनपेक्षित धक्काच दिला.

अल्पावधीतच शेतकरी परिवर्तनला जिल्ह्यातून समर्थन मिळाले तसेच राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने या पॅनलला बळ दिले. स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री मकरंद पाटील हे शेतकरी परिवर्तनच्या पाठिशी उभे राहिल्याने ‘सहकार पॅनल’ने धसका घेतला. बँकेचे मतदार आणि ठेवीदार यांना गृहित धरून निवडणुकीचे राजकारण करणाऱ्या ‘सहकार’ च्या, विरोधात पॅनल उभे राहिल्यानंतर धावपळ होताना दिसली. उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रचार चित्रफितीतून अजितदादांनी ३०० कोटीच्या सॉफ्ट लोनच्या माध्यमातून बुलढाणा जिल्हा बँकेला केलेल्या भरीव मदतीची आवर्जून आठवन करून देत, पक्षाला डावलल्याबद्दल खंत व्यक्त केली.

मेहकर येथे १४१ पैकी १३९ मतदारांनी नोंदविला सहभाग

जिल्हा सहकारी बैंकेच्या उर्वरित ९ संचालक पदासाठी मेहकर येथे श्री शिवाजी विद्यालय मतदान केंद्रात एकूण १४१ पैकी १३९ मतदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली, जिल्हा सहकारी बैंकेच्या निवडणुकीत २१ पैकी १२ संचालक अविरोध निवडून आलेले असून, उर्वरित ९ संचालक पदासाठी रविवारी मतदान झाले. इतर सहकारी संस्था मतदार संप, इतर मागासवर्गीय मतदार संघ, कृषी पतपुरवठा संस्था संग्रामपूर व लोणार मतदार संघ, नागरी सहकारी बैंक मतदारसंघ, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ आणि महिलासाठी राखीव असलेल्या दोन जागांसाठी मतदान झाले, अनुसुचित जाती जमाती मतदार संघासाठी माजी आमदार संजय रायमुलकर मेहकर हे उमेदवार होते, त्यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राजश्री प्रतापराव जाधव, बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी मतदान केले.

Buldhana News: मृद व जलसंधारण अधिकाऱ्यांची कार जप्त; पाझर तलाव भूसंपादनप्रकरणी कोर्टाची कारवाई

Web Title: Buldhana dcc bank election sahakar panel shetkari parivartan panel voting result 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • Buldhan News
  • voting news

संबंधित बातम्या

Buldhana News : कचरा टाकणाऱ्यांवर आता १ हजारांचा दंड; मोताळा कचरा डेपो स्थलांतरित होणार, न.प.च्या बैठकीत निर्णय
1

Buldhana News : कचरा टाकणाऱ्यांवर आता १ हजारांचा दंड; मोताळा कचरा डेपो स्थलांतरित होणार, न.प.च्या बैठकीत निर्णय

Nagpur News : १४ लाखांवर मतदार गळणार? एसआयआरसाठीची मुदत संपली,अर्ज अप्राप्त
2

Nagpur News : १४ लाखांवर मतदार गळणार? एसआयआरसाठीची मुदत संपली,अर्ज अप्राप्त

Satara News : अंतिम मतदार यादीकडे लक्ष; सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम सुरू
3

Satara News : अंतिम मतदार यादीकडे लक्ष; सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.