Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर

Solapur News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर दाखल ३५५ हरकतींपैकी आतापर्यंत ३३० हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली आहे. दक्षिण सोलापूर, सांगोला आणि अक्कलकोटमधील संस्थांवर डबल ठराव, बनावट सह्या आणि ठराव न झाल्याचे गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 06, 2026 | 09:20 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ३५५ हरकतींपैकी ३३० वर सुनावणी पूर्ण
  • अवसायनातील संस्थांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह
  • दोन-तीन दिवसांत अंतिम चित्र स्पष्ट होणार
Solapur News :सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणीला वेग आला आहे. मंगळवारी एकाच दिवसात तब्बल १६० हरकतींवर सुनावणी झाली.

यामध्ये दक्षिण सोलापूर, सांगोला आणि अक्कलकोट तालुक्यातील डेअरी तसेच विविध कार्यकारी संस्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सुनावणीदरम्यान डबल ठराव, ठरावावरील बनावट सह्या आणि प्रत्यक्षात ठरावच न झाल्याचे आक्षेप समोर आल्याची माहिती पुणे विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

३५५ हरकतींपैकी ३३० वर सुनावणी पूर्ण

जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर संपूर्ण जिल्ह्यातून विविध गटांकडून एकूण ३५५ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. यापैकी सोमवारी १७०, तर मंगळवारी १६० अशा एकूण ३३० हरकतींवर आतापर्यंत सुनावणी पूर्ण झाली आहे. उर्वरित २५ हरकतींवर सुनावणी होणे बाकी आहे.

तसेच सांगोला तालुक्यातील काही दूध उत्पादक संस्था आणि सोसायट्यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला आहे. त्यामुळे या संस्था आणि उर्वरित हरकतींवरील सुनावणी आज आणि उद्या होणार आहे.

Maharashtra Drought Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देण्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश

अवसायनातील संस्थांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह

मंगळवारच्या सुनावणीमध्ये अनेक संस्थांच्या मतदार पात्रतेवर गंभीर आक्षेप घेण्यात आले. यामध्ये अवसायनात गेलेल्या, न्यायालयाकडून स्थगिती मिळालेल्या तसेच नोंदणी रद्द झालेल्या संस्थांचा समावेश असल्याचे समोर आले.

एका मतदाराचे नाव पाठविण्यासाठी दोन वेगवेगळे ठराव जोडणे, अध्यक्षांच्या बनावट सह्या करणे आणि ठराव न घेताच मतदारांची नावे पाठविणे, असे आरोपही प्रतिस्पर्धी गटांकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे या हरकतींच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra News : भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

दोन-तीन दिवसांत अंतिम चित्र स्पष्ट होणार

हरकत घेतलेल्या संस्थांना जिल्हा बँक निवडणुकीत मतदानाचा अधिकार द्यायचा की नाही, याचा अंतिम निर्णय विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर घेणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जिल्हा बँकेच्या मतदार यादीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

त्यामुळे आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या राजकीय दिग्गजांचे लक्ष आता या निर्णयाकडे लागले आहे. अंतिम मतदार यादीत कोणत्या संस्थांना स्थान मिळते आणि कोणत्या संस्थांची पात्रता बाद होते, यावर निवडणुकीच्या पुढील समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Solapur news hearing on 160 objections on tuesday administration keeps a close watch on organizations across three talukas cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • Marathi News
  • Solapur News
  • voting news

संबंधित बातम्या

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा
1

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
2

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव
3

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय
4

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.