
Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय सक्षम गव्हांदे हा आपल्या घराबाहेर मित्रांसोबत नेहमीप्रमाणे खेळत होता. तितक्यात अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिथे धाव घेत सक्षमवर हल्ला चढवला. कुत्र्याने सक्षमचा कडकडून चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी धाव घेत त्याला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले.
हल्ल्यानंतर जखमी सक्षमला तातडीने स्थानिक सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सक्षमच्या शरीरात रेबीजची गंभीर लक्षणे दिसून येऊ लागली. परिस्थिती बिकट झाल्याने त्याला तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रेबीजचा संसर्ग पसरल्याने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे जनुना गावावर शोककळा पसरली असून, भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची तीव्र मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे.
Ans: ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना गावात घडली आहे.
Ans: मृत पावलेल्या मुलाचे नाव सक्षम गव्हांदे असे आहे.
Ans: पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्यामुळे मुलाला गंभीर दुखापत झाली होती; उपचारादरम्यान त्याला रेबीजची लक्षणे दिसून आली आणि अकोल्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.