Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: महागाईचा आणखी एक झटका! बुलढाण्यात आरओ पाण्याचे दर वाढले; पिण्याच्या पाण्यासाठीही जादा पैसे मोजावे लागणार

Buldhana RO Water Price Hike: बुलढाण्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच आरओ शुद्ध पाण्याची मागणी वाढली असून, १५ लिटर पाण्याच्या जारसाठी नागरिकांना आता १५ रुपये मोजावे लागत आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 06, 2026 | 06:14 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • पिण्याच्या पाण्यालाही महागाईची झळ
  • बुलढाण्यात आरओच्या दरवाढीने नागरिक हैराण
  • ग्रामीण भागात शुद्ध पाण्याची मागणी वाढली
बुलढाणा: उन्हाळ्याची चाहूल लागताच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊ लागला आहे. वाढती उन्हाची दाहकता, पावसाचे संभाव्य कमी प्रमाण आणि पाणीटंचाईची भीती यामुळे आरओ शुद्ध पाण्याची मागणी वाढत आहे. त्याचवेळी आरओ पाण्याच्या दरातही वाढ झाली. १५ लिटर पाण्यासाठी नागरिकांना आता १५ रुपये मोजावे लागत आहेत. वाढत्या महागाईच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागणारा हा अतिरिक्त खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला चटका देत आहे. (Buldhana)

Farmer News: रब्बी हंगाम पीकविम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत; गहू, हरभरा, कांदा पिकाचा समावेश, कृषी विभागाचे आवाहन

पूर्वी अनेक कुटुंबे विहिरी, हातपंप आणि इतर पारंपरिक जलस्रोतांवर अवलंबून होती. परंतु, दिवसेंदिवस वातावरणातील बदल, क्षाराचे वाढते प्रमाण, दूषित पाणीपुरवठा यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या. डॉक्टरांच्या तपासणीत अनेकदा दूषित पाण्यामुळे आजार होत असल्याचे सांगितल्या जाऊ लागले. परिणामी, नागरिकांनी आरो प्लांटच्या माध्यमातून शुद्ध पाणी पिण्यास पसंती दिली. भूजलपातळीत होणारे बदल आणि पाण्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेली चिंता यामुळे शुद्ध पाण्यासाठी आरओ केंद्रांना प्राधान्य दिले जात आहे. केवळ शहरांपुरती मर्यादित असलेली ही मागणी आता खेड्यापाड्यांतही वाढताना दिसत आहे. घरगुती वापरासोबतच दुकाने, लहान व्यावसायिक आणि विविध संस्थांकडूनही आरओ पाण्याची मागणी होत आहे.

लग्नसमारंभांमध्येही वाढणार खर्च

आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र झाल्यास लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम आणि इतर सार्वजनिक सोहळ्यांमध्ये पाण्याची व्यवस्था करणे, आयोजकांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. मोठ्या कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेता आरओ पाण्यावर अवलंबून राहिल्यास आयोजकांच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण भागात विहिरी आणि हातपंप यासारखे पारंपरिक स्रोत कमी होत असल्याने पर्यायी व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

पाण्याचेही रेट कार्ड सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर?

एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचे दरही वाढत आहेत. दररोजच्या गरजेसाठी पाणी विकत घ्यावे लागत असल्याने कुटुंबांच्या मासिक खर्चात भर पडत आहे. आगामी काळात उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाई वाढल्यास मागणीच्या तुलनेत पुरवठा, दरवाढ आणि उपलब्धता हे प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि पारंपरिक जलस्रोतांचे जतन करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

गृहिणी, सुमन इंगळे, आरोग्याच्या दृष्टीने ने आर, ओ. चे पाणी पिण्यास योग्य असल्याने प्रति १५ लिटर कॅन मागे ५ रुपये अतिरिक्त द्यावे लागत असले तरी आरोग्याच्या दृष्टीने पाणी विकत घ्यावी घ्यावेच लागणार आहे.

बुलढाण्याचे श्रीकिसन जाधव म्हणाले की, घरगुती वापरायला १५ रुपये जास्त नसले तरी, लग्न समारंभात आरओ च्या पाण्याच्या मागणी जास्त असल्यामुळे खिशाला झळ बसणार आहे.

Khamgaon Accident: कार अपघातात दोघांचा मृत्यू, अपघातग्रस्त वाहनात आढळला २६ किलो गांजा; टेंभुर्णा येथे ट्रकने दिली धडक

Web Title: Buldhana ro water price hike 15 litre water jar pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • buldhana news
  • Water Crisis
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Farmer News: रब्बी हंगाम पीकविम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत; गहू, हरभरा, कांदा पिकाचा समावेश, कृषी विभागाचे आवाहन
1

Farmer News: रब्बी हंगाम पीकविम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत; गहू, हरभरा, कांदा पिकाचा समावेश, कृषी विभागाचे आवाहन

Amravati News: अमरावतीत जलसंवर्धनाचा ‘मास्टर प्लॅन’! पुनर्भरणासाठी अडीच कोटींचा आराखडा; अमृत योजनेतून ५० लाख निधी मंजूर
2

Amravati News: अमरावतीत जलसंवर्धनाचा ‘मास्टर प्लॅन’! पुनर्भरणासाठी अडीच कोटींचा आराखडा; अमृत योजनेतून ५० लाख निधी मंजूर

Karanja : विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक, शेतकरी एल्गार समितीतर्फे आंदोलन; प्रशासनाचे वेधले लक्ष
3

Karanja : विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक, शेतकरी एल्गार समितीतर्फे आंदोलन; प्रशासनाचे वेधले लक्ष

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती
4

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.