
Prataprao Jadhav on Buldhana Drought
खामगाव तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ घारोड गावात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते, साऊ एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने आयोजित भाऊबीज कार्यक्रमानिमित्त मंगळवारी रात्री केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी घारोड येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी त्यांनी एकल निराधार महिला देवकाबाई अढाव आणि दुर्गा अनंता कड यांच्या घरी भेट देत त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत असून, दुष्काळाच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. राज्य शासनानेही त्यात अतिरिक्त मदतीची भर घातली आहे.
तसेच दिवाळी अग्रीम म्हणून ५ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन विविध स्तरांवर उपाययोजना करीत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच कर्जमाफी, नदीजोड प्रकल्प आणि जलसंधारणाच्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजना करण्यावरही शासनाचा भर आहे. पाण्याची उपलब्धता वाढवून शेतीला सिंचनाची सुविधा मिळावी आणि भविष्यातील दुष्काळी परिस्थितीचा प्रभाव कमी व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी देवकाबाई अढाव यांच्या घरी जाऊन भाऊबीजेची ओवाळणी स्वीकारली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. एकल निराधार महिलेला भाऊ म्हणून आधार देण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांसोबत बसून त्यांच्या शेतीतील अडचणी, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, कर्जाचा बोजा आणि शासनाकडून मिळालेल्या मदतीबाबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, घारोड गावातील पाणीपुरवठा योजनेच्या अपूर्ण कामासंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देण्यात आली. जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजनेस राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली.
या मंजुरीचे पत्र केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच वैभव – ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी सरपंच वैभव ठाकरे, अॅड. अमोल अंधारे, -राजेंद्र बघे, साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे जिल्हा समन्वयक तथा इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार सचिन ठाकरे, अक्षय मातनकार, राजेश कड, अनंता नरवाडे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
घारोड हे अतिदुर्गम डोंगराळ भागातील गाव असून, दुष्काळाचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्या केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावर मांडण्यासाठी अशा संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Ans: पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मिळतात.
Ans: खरिपाच्या पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.
Ans: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन प्रतापराव जाधव यांनी सांगितले.