Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : शतकापूर्वीचे वृक्ष सुकले की सुकविले? सुकलेले वृक्ष धोकादायक; शहरात विविध चर्चाना आले उधाण

कारंजा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुमारे 100 वर्षे जुन्या कडुलिंबाच्या झाडाच्या सुकलेल्या अवस्थेमुळे नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. झाड नैसर्गिकरीत्या सुकले की जाणीवपूर्वक त्याचे नुकसान करण्यात आले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 26, 2026 | 09:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

कारंजा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील सुमारे 100 वर्षे जुन्या कडुलिंबाच्या झाडाच्या सुकलेल्या अवस्थेमुळे नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. जागृत श्री हनुमान मंदिरालगत असलेले हे ऐतिहासिक झाड नैसर्गिकरीत्या सुकले की जाणीवपूर्वक त्याचे नुकसान करण्यात आले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. झाडाची पाने पूर्णपणे गळून पडली असून फांद्या आणि खोड वाळल्याने ते कधीही कोसळू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Rain Alert: राज्यात पुन्हा हवामान बदलणार! ‘या’ १५ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; IMD कडून यलो अलर्ट जारी

हे झाड शहरातील अत्यंत वर्दळीच्या भागात असून परिसरात चहाची टपरी, सलून आणि इतर व्यावसायिक आस्थापना आहेत. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वृक्षतज्ज्ञांकडून झाडाची तातडीने तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे. झाड नैसर्गिक कारणांमुळे सुकले की अन्य कोणत्या कारणामुळे त्याचे नुकसान झाले, याची चौकशी करण्याचीही मागणी होत आहे.

गो ग्रीन फाउंडेशनचे सदस्य आशिष बंड यांनी पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. तर आपत्कालीन प्रमुख श्याम सवाई यांनी सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक झाड हटवून त्याऐवजी इतर ठिकाणी दहा झाडे लावण्याचा पर्याय सुचवला आहे.

SNDTच्या १११व्या वर्धापनदिनी महर्षी कर्वे यांना अनोखी आदरांजली; राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पर्यावरण अभ्यासकांच्या मते, जुनी झाडे नष्ट झाल्यास त्याभोवतीची संपूर्ण जैविक परिसंस्था धोक्यात येते. काही ठिकाणी झाडांना आग लावणे, आम्ल टाकणे किंवा इतर मार्गांनी हळूहळू सुकवून नंतर तोडण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप केला जात असून, अशा पर्यावरणविघातक कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Dried up trees are dangerous in karanja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • Tree

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.