राज्यात पुन्हा हवामान बदलणार! 'या' १५ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (Photo Credit- AI)
२७ जून रोजी राज्याची राजधानी मुंबई तसेच ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, या जिल्ह्यांतील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. या काळात किनारपट्टीच्या भागात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, त्यामुळे तापमानात घट होईल.
Thunderstorm accompanied with lightning, gusty winds 40-50 kmph, Light to Moderate rain very likely to occur at isolated places in the districts of North konkan , Madhya Maharashtra.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया.https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/KrLbRXVUij — Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 26, 2026
सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि घाटांनी वेढलेल्या पश्चिम महाराष्ट्रातही हवामान विभागाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. शनिवारसाठी पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठीही पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या काही भागांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन; पुणे जिल्ह्याला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह (ताशी ४०-५० किमी) वादळ होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी २७ जून रोजी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वादळाच्या वेळी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, असा सल्ला स्थानिक प्रशासनाने दिला आहे.
राज्याच्या इतर भागांत पावसाची तयारी सुरू असताना, विदर्भातील काही जिल्ह्यांना मात्र पावसासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. या हंगामात आधीच प्रचंड उष्णतेचा सामना करणाऱ्या अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सध्या तरी दुष्काळी परिस्थिती कायम राहील. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील दोन ते तीन दिवसांत या भागांत पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. या जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती २९ जूननंतरच निर्माण होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Alert: दारं, खिडक्या बंद करा! पुढील 6 दिवस धोक्याचे; कोकण अन् गोव्यात…






