
Washim House Break-In Theft News
सदरचे दोन्ही गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक खाटमोडे-पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील अधिकारी व अंमलदारांना दिल्यायावरून स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी रॅन्डो उर्फ फिरोज खान साहेब खान (३६, रा. मुखरी चौक, तुकाराम बापू वॉर्ड, पुसद) याला अटक करून मेहकर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी, वाशिम रामकृष्ण पवार याल मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक सुधाकर आहे, स्थानिक गुन्हे शाखा, जि. वाशिम यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि, सचिन गोखले, पोउपनि शेखर मास्कर, पोलिस अंमलदार गजानन अवगळे, दिलीप देवकते, विनोद अवगळे, भूषण ठाकरे, विठ्ठल महाले, तुषार ठाकरे, संदीप दुतोंडे, अविनाश वाढे, संतोष बाघ, श्याम इंगळे, सुनील तायडे व अंगुली मुद्रा शाखा, वाशिम येथील सपोनि. आशिष भोंडे, पोलिस अंमलदार संदीप सरोदे, महेश आकरे, शीतल मानकर, गणेश बिंगल यांनी केली.
त्याला नमूद दोन्ही गुन्ह्यांबंधाने विचारपूस केली असता त्याने नमूद दोन्ही गुन्हे केल्याची कबूली दिली. त्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेले एकूण ७ तोळे सोन्याची लगड व ९ तोळे चांदीची लगड, असा एकूण किंमत ११,०५,००० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास वाशिम शहर पोलिस स्टेशन करीत आहेत.