Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बंडगार्डन पोलीस ठाणे होणार इतिहासजमा; दोन आठवड्यात इमारत पाडणार

पुण्यातील एक बहुचर्चित तसेच अत्यंत जुने आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारी बंडगार्डन पोलिस ठाण्याची इमारत आता इतिहासजमा होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 28, 2025 | 04:45 PM
बंडगार्डन पोलीस ठाणे होणार इतिहासजमा; दोन आठवड्यात इमारत पाडणार
Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील एक बहुचर्चित तसेच अत्यंत जुने आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारी बंडगार्डन पोलिस ठाण्याची इमारत आता इतिहासजमा होणार आहे. जवळपास ७५ वर्ष पुर्ण केलेली ही इमारत येत्या दोन आठवड्यात पाडली जाणार आहे. येथे प्रशस्त व सर्व सुविधा असणारी इमारत उभारली जाणार असून, त्यासाठी २९ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारील बंडगार्डन पोलिस ठाणे १९५१ मध्ये बांधले आहे. वानवडी पोलिस ठाण्यातून विभाजन होऊन बंडगार्डन पोलिस ठाणे अस्तित्वात आले. जुनी व संख्येमुळे आता ती कमी पडू लागली आहे. त्यामुळे येथे नवीन इमारत उभारली जाणार आहे. पुढील एक-दोन आठवड्यांत त्याचे पाडकाम केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने नवीन पोलिस ठाण्यासाठी निधी मंजूर केला आहे. मात्र, नवीन इमारत पूर्ण व्हायला किमान दोन वर्षे लागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘सध्या या पोलिस ठाण्याच्या कामकाजासाठी नव्या जागेचा शोध सुरू असून, ‘पोलिस ठाण्याचे कामकाज तात्पुरते सोमवार पेठेतील पोलिस वसाहती शेजारी असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या इमारतीत हलवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मात्र, एक आठवड्यात पोलिस ठाणे स्थलांतर करणे अत्यंत अवघड असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रशासनाला या ठिकाणी परिसराचा विकास, सुशोभीकरण व इतर प्रशासकीय कामांसाठी जागा हवी आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पुणे पोलिसांना एक आठवड्याच्या आत जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.

नवीन जागा; २९ कोटींचा निधी

बंड गार्डन पोलिस ठाण्याची जागा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मालकीची आहे. सेंट्रल बिल्डिंगसमोर नवीन पोलिस ठाण्यासाठी २९ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तात्पुरते आता या पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या कार्यालयात स्थलांतर होणार आहे. इमारत उभारल्यानंतर पुन्हा ते त्या ठिकाणी सुरू होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जुने पोलिस ठाणे पाडून त्या ठिकाणी नवीन प्रशस्त व सर्व सुविधा असणारी इमारत उभारली जाणार आहे.

  • १९५१ साली बंडगार्डन पोलिस ठाणे अस्तिवात आले. वानवडी पोलिस ठाण्याचे विभाजन होऊन त्याची सुरूवात झाली.
  • तेव्हा पोलिस आयुक्तालय नव्हते, पुण्याला पोलिस अधीक्षक होते.
  • अत्यंत जुने व लाकडी जिने असलेली ही एकमेव इमारत सध्या होती.
  • झाडी व ऐन चौकात असलेले हे पोलिस ठाणे आकर्षणाचा केंद्र बिंदू असते. पण, जिल्हाधिकारी झाल्यानंतर त्याची कळा गेली.
  • पुणे शहरातील डेक्कननंतर जुनी इमारत म्हणून बंडगार्डन पोलिस ठाणे होते.

Web Title: Bundgarden police station building to be demolished in two weeks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • Amitesh Kumar
  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
3

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
4

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.