
भरती प्रक्रियेत पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर होताच उमेदवारांमध्ये नाराजी
उमेदवार विद्यापीठ प्रशासनाच्या या सततच्या विलंबामुळे त्रस्त
८ डिसेंबर ते २१ डिसेंबर अशी नवी मुदत जाहीर करण्यात आली
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Pune University) १११ शिक्षकीय पदांसाठीच्या भरती प्रक्रियेत पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर होताच उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. अनेक महिन्यांपासून भरती प्रक्रियेची प्रतीक्षा करणारे उमेदवार विद्यापीठ प्रशासनाच्या या सततच्या विलंबामुळे त्रस्त झाले आहेत.
जाहिरात क्र. २८ (दि. १३ सप्टेंबर २०२४) अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक अशा १११ शासनमान्य पदांची भरती जाहीर करण्यात आली होती. पण त्या घोषणेनंतर प्रक्रिया वारंवार पुढे ढकलली जात असून ठोस उपाययोजना आणि कारवाईचा अभाव असल्याची टीका उमेदवारांकडून केली जात आहे.
Pune News: राज्यात नवीन GR नुसार प्राध्यापक भरती; पारदर्शकतेसह गुणवत्तेला प्राधान्य
नवीन नियमांवर सुधारणा करण्याची मागणी शिक्षक संघटनांनीही केली आहे. त्यामुळे ही संपूर्ण भरती प्रक्रिया आता राज्यपालांच्या मंजुरी आणि पुढील निर्णयावर अवलंबून राहिली आहे. राज्यपाल हेच विद्यापीठाचे कुलाधिपती असल्याने अंतिम निर्णयाची जबाबदारी त्यांच्यावर येते.
पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात भरती! पूणेकरांनो… संधीचा फायदा