राज्यात नवीन जीआरनुसार प्राध्यापक भरती (फोटो - istockphoto)
प्राध्यापक भरतीसाठी नवीन शासन निर्णय जारी
उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले स्पष्ट
राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आराखडा
पुणे: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाने राज्यातील सार्वजनिक (अकृषी) विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीसाठी नवीन शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. या निर्णयामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, गुणवत्तापूर्ण आणि एकसमान निकषांवर आधारित होणार असल्याचे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
हा सुधारित आराखडा राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला असून, राज्यातील सर्व विद्यापीठांना तो लागू राहणार आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीसंदर्भात अनेकदा अनियमितता आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याच्या तक्रारी येत होत्या. नविन शासन निर्णय नियम ठरवण्यात आले आहेत. भरती प्रक्रिये मध्ये प्रमुख सुधारणा उमेदवारांचे मूल्यमापन १०० गुणांच्या मापदंडावर केले जाणार असून त्यात ७५ गुण : शैक्षणिक, अध्यापन व संशोधन पात्रता (एटीआर), २५ गुण : मुलाखत कामगिरी (मुलाखत कामगिरी), उमेदवारांना एटीआर मध्ये किमान ५० पेक्षा अधिक गुण मिळाल्यासच मुलाखतीस पात्रता मिळणार आहे.
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता
शैक्षणिक पात्रता – ५५ गुण, अध्यापन अनुभव – ५ गुण, संशोधन कार्य – १५ गुण, एम.फिल/पीएच.डी.– २० गुण, नेट/जेआरएफ/सेट – ६ गुण, संशोधनासाठी फक्त स्कोपस, वेब ऑफ सायन्स वा सायफाइंडर मधील निबंध ग्राह्य पुस्तक लेखन, पेटंट, कॉपीराइट, नवोन्मेष यासाठी अतिरिक्त गुण देण्याची तरतूदही केली आहे.
सहयोगी प्राध्यापक पदासाठी कामगिरी
शैक्षणिक कामगिरी : ४५ गुण, अध्यापन अनुभव – ५ गुण, संशोधन व नवोन्मेष – २५ गुण, स्वयम, एनपीटीईएल, महाज्ञानदीपसारखे कोर्स विकसित करणे, पेटंट, कॉपीराइट, पीएच.डी. मार्गदर्शन, संशोधन प्रकल्प निधी, पुरस्कार यांचा समावेश केला आहे.
प्राध्यापक पदासाठी
शैक्षणिक पात्रता – ४० गुण, अध्यापन अनुभव – ५ गुण, संशोधन व नवोन्मेष – ३० गुण पीएच.डी.मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय प्रकाशने, पेटंट, संशोधन प्रकल्पांसाठी मिळालेला सरकारी निधी यावर आधारित गुणांकन आहे.
मुलाखत प्रक्रिया
मुलाखतीसाठी २५ गुण राखीव असून त्याचे निकष विषयातील सखोल ज्ञान व नवे प्रवाह – १५ गुण, भाषिक प्रावीण्य व आयटी कौशल्ये – ५ गुण, तार्किक विचारसरणी व भावी योजना – ३ गुण, शैक्षणिक विस्तार आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे ज्ञान २ गुण संपूर्ण मुलाखत प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंगसह अनिवार्य करण्यात आली आहे. निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने नोंदी सीलबंद करून सुरक्षित ठेवल्या जाणार आहेत. मुलाखत संपल्यानंतर कमाल एका आठवड्यात अंतिम निकाल व गुणवत्तायादी जाहीर करणे बंधनकारक असेल.
राज्यातील विद्यापीठांमधील शिक्षकभरती प्रक्रियेसाठी शासनाने जाहीर केलेली नवीन पारदर्शक कार्यप्रणाली ही उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे. या भरतीप्रक्रियेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गुणवत्तेचे निकष स्पष्टपणे निश्चित केल्याने विद्यापीठांच्या शैक्षणिक पर्यावरणात सकारात्मक परिवर्तन होईल. ही प्रणाली तरुण प्राध्यापकांना प्रोत्साहन देईल आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सक्षम व कर्तृत्ववान शिक्षक उपलब्ध करून देईल.
— डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ