Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Accident: पुण्यात पुन्हा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’; भर वस्तीत 12 जणांना उडवले, सदाशिव पेठेतील घटना

शनिवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सदाशिव पेठेतील निबाळकर सायकल मार्ट शेजारील साई हॉटेलच्या चहाच्या टपरीवर हे सर्व चहा पीत उभारलेले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: May 31, 2025 | 09:35 PM
Pune Accident: पुण्यात पुन्हा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’; भर वस्तीत 12 जणांना उडवले, सदाशिव पेठेतील घटना
Follow Us
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या भावे शाळेजवळ एका कारने 12 जणांना उडवले आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. एक ठिकाणी चहा पिण्यासाठी आले असताना या 12 विद्यार्थ्याना भरधाव कारने उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये 2 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे आहेत.

कल्याणीनगरमधील ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ म्हणून ओळखला जाणारा पोर्षे अपघातानंतर आता पुण्याच्या मध्यभागात ड्रंक अँड ड्राइव्हचे प्रकरण घडले असून, एका मद्यपी चालकाने भरधाव वेगात चहाच्या टपरीवर थांबलेल्या तरुण-तरुणी अश्या तबल १२ जणांना उडवल्याची खळबळजनक घटना घडली. हा भीषण अपघात सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडला. यातील दोघे गंभीर जखमी असून, इतरांवर प्राथमिक उपचारकरून सोडण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या मित्राला पकडले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कारचालक जयराम शिवाजी मुळे (वय २७) याच्यासह गाडीत बसलेला मित्र राहुल गोसावी या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यास नेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याअपघातात अविनाश दादासाहेब फाळके (वय ३०, रा. माळशिरस सोलापूर), प्रथमेश पांडुरंग पतंगे (वय २६), संदीप सुनील खोपडे (२८), सोनाली सुधाकर घोळवे (वय ३०), मंगेश आत्माराम सुरवसे (३३) तसेच अमित अशोक गांधी (वय ४५) समीर श्रीपाद भाकलीकर (वय ४५), सोमनाथ केशव मेरुकर (वय २८) प्रशांत ब्रह्मदेव बंडगर (वय३०) अशी जखमी झालेल्याची नावे असून, इतर तिघांची नावे समजू शकलेले नाही. दरम्यान यातील दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. तर या 9 जणांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सदाशिव पेठेतील निबाळकर सायकल मार्ट शेजारील साई हॉटेलच्या चहाच्या टपरीवर हे सर्व चहा पीत उभारलेले होते. चहा पीत असताना आरोपी जयराम हा मद्याच्या नशेत भरधाव कार घेऊन जात होता. त्यावेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने चहा पिणाऱ्या या 12 जणांना उडवले. कारचा वेग इतका होता की त्याने उडवत पुढे जाऊन गाडी एका भीतीला उडवले. त्यानंतर नागरिकांनी या चालकाला पकडले तसेच जखमीना रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी येथे धाव घेतली. चालक जयराम याला ताब्यात घेतले.

Web Title: Car hit 12 students in sadashiv peth area of accident near bhave high school pune crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 08:36 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Accident
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले
1

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह
2

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…
3

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
4

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.