
Domestic Case: व्यवसायासाठी २० लाख आण अन् अर्ध्या चपातीवर ३ दिवस उपाशी राहा! नवविवाहितेचा अमानुष छळ...
मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींकडून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी विवाहितेने माहेरून २० लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली जात होती. पैशांची ही मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. तिला सतत टोमणे मारणे, उपाशी ठेवणे आणि मारहाण करणे असे प्रकार सुरू करण्यात आले. आरोपींनी अवघ्या अर्ध्या चपातीवर तब्बल तीन दिवस विवाहितेला उपाशी ठेवल्याचा गंभीर आरोपही पीडितेने केला आहे. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी विवाहितेच्या अंगावरील दागिने आणि सौभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्रही काढून घेतले आणि तिला घराबाहेर हाकलून दिल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
सासरच्या या अमानुष जाचाला कंटाळून अखेर पीडित नवविवाहितेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती अभिषेक वासुदेव याच्यासह बाजीराव वासुदेव, शर्मिला वासुदेव, राजू हजारे, सायली हजारे आणि अभिजीत वासुदेव यांच्याविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
Ans: ही घटना कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरात घडली असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: नवीन व्यवसायासाठी माहेरून २० लाख रुपयांची मागणी पूर्ण न झाल्याने मारहाण करणे, अर्ध्या चपातीवर तीन दिवस उपाशी ठेवणे, दागिने व मंगळसूत्र काढून घेणे आणि घराबाहेर हाकलून देणे असे आरोप पीडितेने केले आहेत.
Ans: शिवाजीनगर पोलिसांनी पती अभिषेक वासुदेवसह बाजीराव वासुदेव, शर्मिला वासुदेव, राजू हजारे, सायली हजारे आणि अभिजीत वासुदेव या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.