Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

Career News : महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी मोठी बातमी आहे. 29 सप्टेंबरपासून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ सुरू होणार असून 12 जिल्ह्यांत 412 हून अधिक रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

  • By विवेक
Updated On: Sep 27, 2026 | 05:04 PM
job

job

Follow Us
Follow Us:
  • 29 सप्टेंबरला मुंबईत रोजगार महाकुंभाचा राज्यस्तरीय शुभारंभ
  • 12 जिल्ह्यांत 412 हून अधिक रोजगार मेळावे; 25 हजारांपेक्षा जास्त संधी
  • 1,500 कंपन्या आणि 3 हजारांहून अधिक उद्योग आस्थापना सहभागी होणार
 

Career News : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’चा राज्यस्तरीय शुभारंभ मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याच दिवशी कोकण व नाशिक विभागातील रोजगार मेळावे होणार आहेत. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित हा सोहळा श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ, चर्चगेट येथे होईल.

यावेळी या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री जयकुमार रावल, मंत्री आकाश फुंडकर, महापौर रितू तावडे, खासदार मिलिंद देवरा व खासदार अरविंद सावंत यांच्यासह, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. हेमलता बागल, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, आयुक्त डॉ. अमित सैनी, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी यासह वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कोकण व नाशिक विभागात ४१८ रोजगार मेळावे

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या उपक्रमांतर्गत कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांत ४१२ हून अधिक रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. या उपक्रमात कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग तसेच नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. या मेळाव्यांमधून स्थानिक स्तरावर २५ हजारांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! IIIT Pune च्या संशोधन प्रकल्पांना केंद्र सरकारचे मोठे अनुदान प्राप्त

या महाकुंभात १ हजार ५०० हून अधिक नामांकित कंपन्या आणि ३ हजारांहून अधिक उद्योग आस्थापना सहभागी होणार आहेत.उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभव उपलब्ध रिक्त पदांशी जोडण्यासाठी ‘उमेदवार–रिक्त पद जुळवणी’ करण्यात येणार आहे. त्यामुळे युवक-युवतींना थेट रोजगार संधींसह उद्योगांच्या मनुष्यबळविषयक गरजा, आवश्यक कौशल्ये आणि विविध क्षेत्रांतील करिअर संधींची माहिती मिळेल. उद्योगांनाही आवश्यक मनुष्यबळ निवडण्याची सुविधा उपलब्ध होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि सॉफ्ट स्किल्सचे प्लेसमेंटपूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे.

रोजगार महाकुंभात सहभागी होण्यासाठी उमेदवार आणि उद्योजकांना क्यूआर कोडद्वारे नोंदणी करता येईल. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इच्छुकांनी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) किंवा जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘लाडक्या बहिणीं’साठी विशेष रोजगार मेळावा

या महाकुंभांतर्गत एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘लाडक्या बहिणीं’साठी स्वतंत्र रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यात सुमारे ६०० ते ७०० महिला उमेदवार सहभागी होणार आहेत. विविध कंपन्यांच्या स्टॉलवर महिलांना उपलब्ध पदे, आवश्यक पात्रता, कामाचे स्वरूप, वेतनश्रेणी आणि भरती प्रक्रियेची थेट माहिती मिळेल.

कंपनी प्रतिनिधींशी संवाद साधण्याबरोबरच त्यांना मुलाखती देण्याची संधीही मिळणार आहे. महिलांच्या कौशल्याला रोजगाराची जोड देऊन त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे हा या विशेष मेळाव्याचा उद्देश आहे.

SBI Free Online Courses: करिअरला द्या नवी दिशा! SBI च्या ‘या’ फ्री ऑनलाईन कोर्सेसमधून मिळवा फायनान्सचे धडे

Web Title: Career news maharashtra rojgar mahakumbh 2026 25000 jobs employment fair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Career News
  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Goverment
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

Laptop Tips and Tricks: लॅपटॉप वापरता? मग हे ५ जादुई शॉर्टकट नक्की शिका; तासाभराचे काम होईल काही मिनिटांत!
1

Laptop Tips and Tricks: लॅपटॉप वापरता? मग हे ५ जादुई शॉर्टकट नक्की शिका; तासाभराचे काम होईल काही मिनिटांत!

Indian Railway Jobs: दहावी पास तरुणांसाठी रेल्वेत बंपर भरती! ना परीक्षा, ना मुलाखत; थेट गुणवत्तेवर होणार निवड
2

Indian Railway Jobs: दहावी पास तरुणांसाठी रेल्वेत बंपर भरती! ना परीक्षा, ना मुलाखत; थेट गुणवत्तेवर होणार निवड

Education News: परदेशातील उच्च शिक्षणाला ‘ब्रेक’! २०२३ मधील ९.०८ लाखांवरून संख्या थेट ६.२६ लाखांवर
3

Education News: परदेशातील उच्च शिक्षणाला ‘ब्रेक’! २०२३ मधील ९.०८ लाखांवरून संख्या थेट ६.२६ लाखांवर

Ganesh Naik Bungalow Fire : मुंबईत खळबळ! वनमंत्री गणेश नाईक यांच्या ‘पावन गड’ बंगल्यात अचानक आग; जीवितहानी टळली
4

Ganesh Naik Bungalow Fire : मुंबईत खळबळ! वनमंत्री गणेश नाईक यांच्या ‘पावन गड’ बंगल्यात अचानक आग; जीवितहानी टळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.