Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBI कडून देशमुखांविरुद्ध ‘या’ प्रकरणात गुन्हा दाखल; माजी गृहमंत्री म्हणाले, फडणवीसांकडून…

महाविकास आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2024 | 04:32 PM
CBI कडून देशमुखांविरुद्ध 'या' प्रकरणात गुन्हा दाखल; माजी गृहमंत्री म्हणाले, फडणवीसांकडून...

CBI कडून देशमुखांविरुद्ध 'या' प्रकरणात गुन्हा दाखल; माजी गृहमंत्री म्हणाले, फडणवीसांकडून...

Follow Us
Close
Follow Us:

महाविकास आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गिरीश महाजन यांच्याखोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दवाब टाकल्याचा आरोप करत सीबीआयने देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विद्यमान मंत्री व आमदार गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा आरोपांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विद्यमान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

गिरीश महाजन यांच्या या प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांना आरोपी केले आहे. याआधी या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण इतर काही जणांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध जवाब दिला होता. त्यानंतर सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर देशमुखांची देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत. किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात आहे असे देशमुख म्हणाले आहेत.

धन्यवाद…
देवेंद्रजी फडणवीस
माझ्यावर #CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी #BJP च्या या दडपशाही… — ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 4, 2024

गुन्हा दाखल झाल्यानंतर देशमुख यांनी ट्विट केले आहे. ”धन्यवाद…देवेंद्रजी फडणवीस. माझ्यावर #CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी #BJP च्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे. महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे !” असे देशमुख आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहेत.

विरोधी पक्षनेता असताना देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि अनेक घटनांचा व्हिडीओ रेकॉर्डिंग असणारा पेनड्राइव्ह विधानसभेत सादर केला होता. आता याच प्रकरणात गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा आरोपांखाली सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान काही कालावधी आधी गिरीश महाजन यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन देशमुख यांना याबद्दल जाब विचारला होता.

Web Title: Cbi registered a case against anil deshmukh in the girish mahajan case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 04:31 PM

Topics:  

  • anil deshmukh
  • BJP
  • girish mahajan
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.