समीर वानखेडे यांना पुन्हा सीबीआयने समन्स बजावले ; २४ मे रोजी हजर राहण्यास सांगितले
मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना सीबीआयने पुन्हा एकदा समन्स पाठवले आहे. त्यांना २४ मे रोजी सीबीआयसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना सीबीआयने पुन्हा एकदा समन्स पाठवले आहे. त्यांना २४ मे रोजी सीबीआयसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याप्रकरणी आणि लाच मागितल्याप्रकरणी सीबीआय चौकशी करणार आहे. (CBI summons Sameer Wankhede )
याआधीही सीबीआयने त्यांची दोनदा चौकशी केली आहे. ड्रग्ज प्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे आणि इतरांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी समीर वानखेडे यांनी सोमवारी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देऊन सुरक्षेची मागणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्याना आणि त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले. वानखेडे यांनी प्रतिनिधीमार्फत दक्षिण मुंबईतील पोलिस आयुक्तालयाला हे पत्र पाठवले. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला कॉर्डेलिया क्रुझ ‘अमली पदार्थ’ प्रकरणात अडकवू नये यासाठी सीबीआयने 11 मे रोजी वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध बॉलिवूड अभिनेत्याकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
वानखेडे यांच्यावर कथित गुन्हेगारी कट, खंडणीची धमकी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत लाचखोरीच्या तरतुदींचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारी सीबीआयने वानखेडे यांची चौकशी केली. भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी वानखेडे यांनी दावा केला आहे की, त्यांना आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांना गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर जिवे मारण्याच्या धमक्या आणि आक्षेपार्ह संदेश मिळत आहेत.
Web Title: Cbi summons sameer wankhede again asked to appear on may 24 nrab