Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdas Athawale On Love Jihad Law: ‘लव्ह जिहाद’वरून महायुतीत वाद? आठवलेंचा विरोध; म्हणाले, “यास माझी सहमती नाही मात्र…”

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. यानंतर आता फडणवीस यांचे सरकार ‘लव्ह जिहाद’बाबत निर्णय घेणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 16, 2025 | 08:15 PM
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार पीडित कुटुंबियांची भेट

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार पीडित कुटुंबियांची भेट

Follow Us
Follow Us:

राज्यामध्ये महायुतीचे दुसऱ्यांदा सरकार आल्यानंतर सर्व नेते ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. यानंतर आता फडणवीस यांचे सरकार ‘लव्ह जिहाद’बाबत निर्णय घेणार आहे. महाराष्ट्रमध्ये याबाबत कायदा आणला जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक देखील घेतली. दरम्यान या कायद्याला महाविकास आघाडीचा विरोध पाहायला मिळत आहे. मात्र महायुतीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील या कायद्याला विरोध दर्शवला आहे.

राज्यामध्ये अनेकदा ‘लव्ह जिहाद’च्या अनेक केसेस समोर आणल्या आहेत. या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (दि.14) राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली आहे. महायुती सरकारने यासंबंधीचा एक शासन निर्णय देखील जारी केला आहे. दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या कायद्याला विरोध दर्शविला आहे. त्यांनी लव्ह-जिहाद त्यांनी विरोध केला आहे. असे म्हणणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार

महाराष्ट्र सरकारच्या या धोरणाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, “लव्ह-जिहाद कायद्याला माझा विरोध आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजातील तरुण-तरूणी एकत्रित आले की त्यास लव्ह जिहाद असे म्हणणे योग्य नाही. माझी यास सहमती  नाही. मात्र धर्मांतर होऊ नये म्हणून कायद्यात यासाठी तरतूद असली पाहिजे. केंद्रातील मोदी सरकार हे अतिरेकी मुस्लिमांच्या विरोधात आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात सरकार नाही. ”

लव्ह जिहाद कायदा

लव्ह जिहादबाबत अशाप्रकारचा कायदा याआधी उत्तर प्रदेश आणि इतर काही राज्यात अस्तित्वात आलेला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये देखील हा कायदा आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. महायुती सरकारने याबाबत जीआर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये लिहिले आहे की, राज्यातील विविध संघटना व काही नागरिकांनी लव्ह जिहाद व फसवणूक करून किंवा बळजबरीने केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत निवदेने सादर केली होती. भारतातील काही राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदा करण्यात आला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहादच्या विरोधातील कायदा करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, असे या शासन निर्णयात म्हटले आहे.

यापूर्वी देखील महायुतीमधील नेत्यांनी लव्ह जिहाद’ विरोधात आवाज उठवला आहे. तसेच या संदर्भात कठोर पाऊले उचलण्याची गरज असल्याचे देखील सांगितले आहे. लव्ह जिहादबाबत राज्यामध्ये कायदा असल्याची गरज असल्याचे मत यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते. बळजबरीने होणारे धर्मांतर, विशेष करून आंतरधर्मीय लग्नाच्या माध्यमातून होणारे धर्मांतर (लव्ह जिहाद) रोखण्यासाठी लवकरच कायदा करू, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी व्यक्त केले होते.

Web Title: Central minister oppoe to love jihad act mahayuti maharashtra cm devendra fadnavis government marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Love Jihad
  • Mahayuti
  • Ramdas Athawale

संबंधित बातम्या

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा
1

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.