
kolhapur News
चंदगड, आजरा, गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज चंदगड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सर्वांचे स्वागत आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने आमच्यावर विश्वास टाकून सत्तेची सूत्रे हाती दिली. सत्ता आल्यानंतर आम्ही तत्काळ विकास कामांना प्राधान्य दिले चंदगड तालुक्यासाठी सांगायचं झालं तर आत्तापर्यंत २५० कोटी रुपये विविध विकास कामासाठी दिले आहेत .यामध्ये पाणीपुरवठा योजना ,सांड पाण्याचे निर्गतीकरण, गटार योजना, रवळनाथ मंदिर ,समाज कल्याणच्या माध्यमातून निधी ,उधान योजना, रस्ते कामे आदीसाठी या निधीचा उपयोग केला आहे. (Political News)
लोकशाहीने मताचा अधिकार दिला आपल्याला एक जबाबदारी दिली. त्यामुळे मूलभूत परिवर्तन घडले आज शक्तीपीठ मार्ग जर चंदगड तालुक्यातून झाल्यास चंदगड परिसराचा विकास होणार आहे. त्यामुळे या तालुक्याला पर्यटनाचा दर्जा मिळणार आहे. पर्यटना बरोबरच एमआयडीसी, लॉजिस्टिक पार्क याला प्राधान्य देणार आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेल्या उमेदवारांना त्याचबरोबर आघाडीच्या सर्व नगरसेवकांना मतदान करून महाविकास आघाडीला पुन्हा एकदा सत्तेत आणा असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडीक, जिल्हाअध्यक्ष नाथाजी पाटील ,माजी आमदार भरमू पाटील, शिवाजी बुवा, अनंत गुरव ,मेघराज जाधव ,सुनील कणेकर, अशोक चराटी, गंगाधर हिरेमठ ,स्वाती कोरे, महेश जाधव, संजय घाटगे, अमरीश घाटगे ,आदी यावेळी उपस्थित होते.