Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हातोबा टेकडीवर आगीमुळे अनेक झाडं नष्ट; चंद्रकांत पाटील भडकले

कोथरुड मधील म्हातोबा टेकडीवरील आगीच्या घटनेमुळे चंद्रकांत पाटील संतप्त झाले असून, अशा विकृतींना चाप बसविण्याचे निर्देश आज पुन्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 06, 2025 | 12:50 PM
म्हातोबा टेकडीवर आगीमुळे अनेक झाडं नष्ट; चंद्रकांत पाटील भडकले

म्हातोबा टेकडीवर आगीमुळे अनेक झाडं नष्ट; चंद्रकांत पाटील भडकले

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कोथरुड मधील म्हातोबा टेकडीवरील आगीच्या घटनेमुळे चंद्रकांत पाटील संतप्त झाले असून, अशा विकृतींना चाप बसविण्याचे निर्देश आज पुन्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच, झाडांच्या सुरक्षेसाठी उपाय योजनांसंदर्भात १३ जानेवारी रोजी वन विभागाच्या मुख्यालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कोथरुडमधील म्हातोबा, पाषाण, महात्मा टेकडीवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्षांची लागवड केली. गेल्या आठवड्यात तीन वेळा म्हातोबा टेकडीवर येणाऱ्या काही टवाळखोरांनी आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर आज पाटील यांनी घटनास्थळाची पाहाणी करुन आढावा घेतला.

यावेळी वन विभागाचे अधिकारी मुख्य वन संरक्षक मनोज बारबोले, सहाय्यक उप वन संरक्षक दिपक पवार, भाजपा कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सरचिटणीस दिपक पवार, दिलीप उंबरकर, सचिन मोकाटे, म्हातोबा टेकडी ग्रुपचे दामोदर कुंबरे, रोहिदास सुतार, दंडवते मारुती टेकडी ग्रुपचे संजीव उपळेकर, गणेश आंग्रे, जयंतराव पेशवे, राजू इनामदार, तात्यासाहेब निकम, विश्वास कुलकर्णी, निसर्गप्रेमी रमेश दांडेकर यांच्यासह अनेक पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

या पाहाणी वेळी मुख्य वन संरक्षक मनोज बारबोले यांनी घटनेची माहिती चंद्रकांत पाटील यांना दिली. त्यावर घटना घडू नये, यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा केली. त्यावर मनुष्यबळ अभावामुळे अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यात मर्यादा येत असल्याचे अधिकाऱ्यांनी पाटील यांच्यासमोर स्पष्ट केले. त्यावर लोकसहभागातून मनुष्यबळ उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

झाडांच्या सुरक्षेसाठी टेहळणी बुरुज उभारणे, रात्रीच्या सुमारास अशा घटना टाळण्यासाठी म्हातोबा मंदिर परिसरात सौर ऊर्जेद्वारे पथदिवे कार्यान्वित करणे, झाडांची निगा राखण्यासह वाळलेले तण काढण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे, पर्यावरण संवर्धनासाठी कॅम्प उपक्रम राबविणे, टेकडींवर गुरांना चराईवर नियंत्रण आणणे, यांसह दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात संपूर्ण भागात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त वाढविणे आदी सूचना करण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा : खळबळजनक! आळंदीतील एका महाराजाचं दोन अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य

त्यावर लोकसहभागातून मनुष्यबळ वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली. तसेच, गस्त वाढविण्यासाठी होमगार्डची मदत घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. त्यासोबतच झाडांच्या सुरक्षेसाठी प्रशासनासमोरच्या इतर अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी १३ जानेवारी रोजी बैठक घेणार असल्याचेही स्पष्ट केले. यामध्ये प्रशासन आणि पर्यावरण प्रेमींसोबत संवाद प्रस्थापित करुन, वृक्ष संवर्धनामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Chandrakant patil is furious as many trees have been destroyed due to fire on mhatoba hill nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • Kothrud News
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
4

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.