संग्रहित फोटो
आळंदी : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन वारकरी साधक विद्यार्थ्यांवरती सोबत राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय महाराजाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यात त्याला एका महिलेने देखील मदत केल्याचे समोर आले आहे. आळंदी पोलिसांनी आरोपीवर पाँस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महेश नामदेव मिसाळ (टोपण नाव मामा) (वय २८ वर्षें रा. खोकरमोहा, ता. शिररकासार, जि. बीड) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली तर साथीदार महिला आरोपीवरील आरोपाचा तपास सुरू असून तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत आळंदी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आळंदी येथे वारकरी शिक्षण देणारी खाजगी संस्था आहे. यात अल्पवयीन मुले वारकरी शिक्षण घेत आहेत. यात आरोपी देखरेखीच काम पाहत होता. शनिवारी ( दि.४) रोजी रात्री दोन अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपीने ही मुले झोपली असताना त्यांच्या सोबत अनैसर्गिक कृत्य केले.
याबाबत सदर महिलेला समजल्यावर तिने प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला. मुलांनी याबाबत आपल्या आईला सांगितल्यावर सदर प्रकार उघडकीस झाला असून, मुलांच्या आईने फिर्याद दिल्यावर महराजाला गजाआड करण्यात आले आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : मोक्कातील 801 गुन्हेगारांचा जामीन, भाईगिरीचाही दावा; आरोपींवर पुणे पोलिसांची नजर
राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले
गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.