अखेर १३ वर्षांनंतर निवडणुकीत विजय! चंद्रपूर जिल्हा बँकेवर भाजपची प्रथमच एकहाती सत्ता (फोटो सौजन्य-X)
Chandrapur District Bank News in Marathi : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भारतीय जनता पक्षाने प्रथमच एकहाती सत्ता मिळविली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यतर्वी सहकारी बॅंकेच्या 21 पैकी 15 संचालक हे भाजपचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रथमच बॅंकेवर वर्चस्व मिळविले आहे. आता आम्ही बॅंकेच्या 15 जागा जिंकल्या आहेत. आगामी काळात सर्वच्या सर्व 21 जागा आम्ही जिंकू असा दावाही बंटी भांगडीया यांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. या बँकेची १३ वर्षांनंतर निवडणुकीत विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय चिमुरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या पुढाकाराने या बँकेवर पहिल्यांदाच भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच भाजपमध्ये प्रवेश करणारे संचालक रवींद्र शिंदे यांची अध्यक्षपदी आणि संजय डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. एकूण २१ संचालक असलेल्या या बँकेत भाजपच्या बाजून १७ संचालक असल्याचे स्पष्ट झाले.
१० जुलै रोजी नऊ संचालक पदांसाठी रोजी निवडणूक पार पडली होती. तर १२ संचालक बिनविरोध निवडले आले होते. फडणवीस यांचे जवळचे आमदार बंटी भांगडिया यांनी यापूर्वीच घोषणा केली होती की, २२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवशी गिफ्ट देणार. त्यानुसार किंगमेकर भूमिका बजावत त्यांनी ही बँक खेचून आणली. सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण बँक आणि बँक योजना राबवू, अशी ग्वाही सत्तापक्षाने दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुका लढलो. निवडणुकीदरम्यान आम्हाला मुख्यमंत्री फडणवीस यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला निवडणुका जिंकण्यात यश मिळाले. बंटी भांगडिया म्हणाले की, आम्ही चंद्रपूर बँकेच्या निवडणूक लढवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवशी भेटवस्तू दिली आहे.
चंद्रपूर जिल्हा बँक ही एकमेव शेतकरी बँक आहे. आम्ही त्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहोत. इथून मागे संचालक म्हणून आम्ही होत असलेल्या चुकीच्या गोष्टी सगळ्यांसमोर आणल्या. आताही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करू, असे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र शिंदे म्हणाले.