Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे आवाहन! कोण घेणार माघार? कोणाला मिळणार संधी? सर्वांचेच लागले लक्ष

चंद्रपुरातील ६६ जागांसाठी एकूण ५६२ उमेदवारांनी चंद्रपूर मनपा निवडणुकीत १७ प्रभागातील नामांकन दाखल केले आहे. आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. कोण माघार घेणार आणि कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 02, 2026 | 12:21 PM
Chandrapur News: राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे आवाहन! कोण घेणार माघार? कोणाला मिळणार संधी? सर्वांचेच लागले लक्ष

Chandrapur News: राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे आवाहन! कोण घेणार माघार? कोणाला मिळणार संधी? सर्वांचेच लागले लक्ष

Follow Us
Close
Follow Us:
  • राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचं खुलं आव्हान!
  • कोण माघार घेणार, कोण उभा राहणार?
  • बंडखोरीमुळे समीकरणं बदलणार?
चंद्रपूर: तीन वर्षांपासून प्रशासक राज असलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे मागील ८ वर्षापासून मैदानात उतरण्याचे अनेक कार्यकत्यांचे स्वप्न होते. मात्र ऐनवेळी भाजप व काँग्रेस या दोन्ही मोठ्या राजकीय पक्षांकडून निष्ठावंत कार्यकत्यांना डावलून उपऱ्यांना संधी देण्यात आली. परिणामी निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. तर नाराज झालेल्या कार्यकत्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली असल्याने, राजकीय पक्षांसमोर बंडखोरीचे आवाहन निर्माण झाले आहे.

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार

मागील दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यातील नगरपरिषदा व महानगर पालिकेच्या निवडणुकांवर स्थगिती आली होती. त्यामुळे कोणत्याही पदाची व उमेदवारीची अपेक्षा न करता विधानसभा, लोकसभा निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्ते पक्षासाठी झटले. नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली. नगरपरिषदांच्या निकालानंतर बंडखोरीचे गणित लक्षात घेत, काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एबी फार्मचे वाटप केले. त्यामुळे ऐनवेळी निष्ठावंत कार्यकत्यांना पक्षाकडून तिकीट न देता बाहेरच्या पक्षातून आलेल्या उपऱ्या उमेदवारांना संधी देण्यात आली. (फोटो सौजन्य – Pinterest) 

त्यामुळे ऐनवेळी अनेक ठिकाणी भाजप व कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. भाजपामध्ये आ. सुधीर मुनगंटीवार व आ. किशोर जोरगेवार यांच्या वादामध्ये मुनगंटीवार समर्थकांना झटका देण्यात आला. ज्यात प्रामुख्याने वंदना तिखे, चंद्रकला सोयाम, वंदना जांभूळकर, विशाल निंबाळकर, अजय सरकार, माया उईके, राहुल घोटेकर, रवी आसवानी, शीतल आत्राम यांचा समावेश आहे. तर खा. प्रतिभा धानोरकर व आ. विजय वडेट्टीवार यांच्या वादात वडेट्टीवार समर्थक असलेल्या माजी नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढिया, प्रशांत दानव, सकिना अन्सारी यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. तिकीट कापण्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे.

बंडखोरीने कोणाचा होणार लाभ?

पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाने बंडखोरी टाळण्यासाठी नामांकनाच्या अंतिम दिवशी उमेदवारी जाहीर केली. असे करूनही अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दोन्ही पक्षांसमोर बंडखोरीचे आवाहन निर्माण झाले आहे. पंक्षांतर्गत नाराजीसत्राचे परिणाम मतदानावर होऊन तिसऱ्या पक्षाचा अथवा अपक्ष उमेदवाराचा लाभ होण्याची शक्यता नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

पालघरचे मच्छिमार शासनाच्या दुर्लक्षतेला पडले बळी? मृत्यूच्या आकड्यात वाढ झाल्याने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

५६२ उमेदवारांचे नामांकन दाखल

६६ जागांसाठी एकूण ५६२ उमेदवारांनी चंद्रपूर मनपा निवडणुकीत १७ प्रभागातील नामांकन दाखल केले आहे. शुक्रवारी (दि. २) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास कोणत्या प्रभागातून कोणता पक्ष यशस्वी होते? हे पाहण्यासारखे आहे. बंडखोर उमदेवारांनी अर्ज मागे न – घेतल्यास पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आवाहन निर्माण होईल हे निश्चित आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Chandrapur politics news call for rebellion shakes political parties who will step back and who will get the opportunity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Chandrapur
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम
1

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई
2

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?
3

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?

BMC Election 2026: राज्यातील २९ महापालिकांसाठी प्रचाराला वेग; मुंबईत 114 चा जादुई आकडा कोण गाठणार?
4

BMC Election 2026: राज्यातील २९ महापालिकांसाठी प्रचाराला वेग; मुंबईत 114 चा जादुई आकडा कोण गाठणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.