Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: मुसळधार पाऊस कोसळूनही चंद्रपूरातील एकही मोठं धरण ओव्हरफ्लो नाही; १३ रस्ते वाहतुकीसाठी बंद

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून नद्या-नाले तुडुंब भरले आहेत आणि अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र, या पावसानंतरही जिल्ह्यातील एकही मोठे किंवा मध्यम धरण अद्याप ओव्हरफ्लो झाले नसल्याने सर्वांचे लक्ष आता धरणांतील वाढत्या पाणीसाठ्याकडे लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 01, 2026 | 02:49 PM
Chandrapur News: मुसळधार पाऊस कोसळूनही चंद्रपूरातील एकही मोठं धरण ओव्हरफ्लो नाही; १३ रस्ते वाहतुकीसाठी बंद

Chandrapur News: मुसळधार पाऊस कोसळूनही चंद्रपूरातील एकही मोठं धरण ओव्हरफ्लो नाही; १३ रस्ते वाहतुकीसाठी बंद

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असला तरी एकही मोठा किंवा मध्यम सिंचन प्रकल्प अद्याप ओव्हरफ्लो झालेला नाही.
  • अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १३ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून अनेक ठिकाणी नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
  • धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत असून पाऊस कायम राहिल्यास लवकरच जलसाठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर: जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र जलमय वातावरण निर्माण झाले आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी नदीपात्रातील विसर्गात मोठी वाढ झाली आहे. शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. मात्र, या मुसळधार पावसानंतरही जिल्ह्यातील एकाही मोठ्या किंवा मध्यम सिंचन प्रकल्पातून अद्याप ‘ओव्हरफ्लो’ झालेला नसल्याच सुरू वास्तव आहे.

Raigad News: माथेरानला जाणार असाल तर ही बातमी आधी वाचा! रविवारी पहाटे 5 ते 8.30 वाजेपर्यंत घाटरस्ता बंद, पर्यटकांना मोठा फटका

यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीलाच अपेक्षित पाऊस न झाल्याने जून महिना बहुतांश कोरडाच गेला. परिणामी धरणे, तलाव आणि जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण होऊ शकला नाही. जूनच्या अखेरीस पावसाने काही प्रमाणात जोर धरला असला, तरी जुलै महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा खंड पडल्याने जलसाठा वाढीचा वेग मंदावला. आता जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टच्या प्रारंभी पावसाने जोरदार पुनरागमन केल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे.

नदीकाठच्या भागांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अनावश्यकपणे नदीपात्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. काही लहान बंधारे आणि साठवण तलाव भरल्याने त्यावरून पाणी वाहू लागले असले, तरी प्रमुख सिंचन प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेपासून दूर आहेत. सिंचन प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक सातत्याने सुरू असल्याने काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास जलसाठ्यात आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष आता धरणे ‘ओव्हरफ्लो’ होण्याकडे लागले आहे. पाणीसाठा वाढल्यास खरीप हंगामासह आगामी रब्बीसाठीही पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होणार आहे. पिण्याच्या पाण्याची चिंताही मोठ्या प्रमाणात कमी होईल.

Amba Ghat Alert: मुसळधार पावसाचा फटका! आंबा घाटातील रस्त्याला भेगा, अवजड वाहनांवर तातडीची बंदी

गोंडपिपरी, वरोरा मार्गावरी रहदारी ठप्प

अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १३ रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. मूल, गोंडपिपरी, वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना आणि बल्लारपूर तालुक्यातील काही मार्गांवर पूल, नाले व रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक थांबविण्यात आली आहे. सर्वाधिक कोरपना तालुक्यात ४, तर राजुरा तालुक्यात ३ आणि बल्लारपूर तालुक्यात २ रस्ते बंद आहेत. चंद्रपूर, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा आणि जिवती तालुक्यांतील प्रमुख मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur heavy rain no major dam overflow yet despite heavy rain 13 roads closed across district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.