Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: जानाळा-पोंभूर्णा रस्त्याच्या निकृष्ट कामावर काँग्रेस आक्रमक; 10 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा बेमुदत उपोषण

चंद्रपूर जिल्ह्यातील जानाळा-पोंभूर्णा मार्गाच्या कामावर निकृष्ट दर्जा आणि निष्काळजीपणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, सुधारणा न झाल्यास बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 20, 2026 | 01:34 PM
Chandrapur News: जानाळा-पोंभूर्णा रस्त्याच्या निकृष्ट कामावर काँग्रेस आक्रमक; 10 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा बेमुदत उपोषण

Chandrapur News: जानाळा-पोंभूर्णा रस्त्याच्या निकृष्ट कामावर काँग्रेस आक्रमक; 10 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा बेमुदत उपोषण

Follow Us
Follow Us:

जानाळा-पोंभूर्णा मार्गावरील काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत काँग्रेसने प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

  • नाली बांधकामादरम्यान पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन फुटल्याने अनेक गावांमध्ये नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
  • निर्धारित मुदतीत सुधारणा न झाल्यास काँग्रेसने बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे.
चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत हायब्रीड ॲन्यूटी मॉडेल अंतर्गत सुरू असलेल्या जानाळा-पोंभूर्णा मार्गाच्या कामावर निकृष्ट दर्जा आणि निष्काळजीपणाचे गंभीर आरोप होत आहे. या कामाविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. कंत्राटदाराकडून करारातील अटी-शर्तीचे उल्लंघन करून मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग! 20 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

रस्त्याच्या दुतर्फा सुरू असलेल्या नाली बांधकामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खोदकामादरम्यान अनेक गावातील पाणीपुरवठ्याच्या भूमिगत पाइपलाइन फुटल्याने काही ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता वंजारी यांची भेट घेऊन तक्रार केली होती. त्यावेळी काम नियमांनुसार केले जाईल आणि नागरिकांना त्रास होणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला. यापूर्वी रस्तारोको आंदोलन करूनही प्रशासन आणि कंत्राटदाराने दखल घेतली नसल्याने आता काँग्रेसने दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत कामाचा दर्जा सुधारला नाही, तर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. दरम्यान, जानाळा-पोंभुर्णा मार्गासोबतच मूल-चामोर्शी मार्गावरील कामाबाबतही निकृष्ट दर्जाच्या तक्रारी समोर येत असून, दोन्ही कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

‘आश्वासनांचा पाऊस; कामाचा दर्जा मात्र जैसे थे’

जानाळा-पौभूर्णा मार्गावरील कामाबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रारीचा पाढा वाचला होता, त्यानंतर काम नियमांनुसार होईल, नागरिकांना त्रास होणार नाही आणि गुणवत्तेची तडजोड केली जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, निकृष्ट कामाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Mumbai Local Train Update : 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोठा दिलासा! अंबरनाथ, बदलापूर, कर्जत प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

१० दिवस… अन्यथा बेमुदत उपोषण

आनाळा-पोभूर्णा मार्गावरील निकृष्ट दर्जाचे काम तातडीने सुधारावे, कंत्राटदारावर कारवाई करून गुणवत्तेनुसार काम पूर्ण करावे, अशी काँग्रेसची ठाम मागणी आहे. प्रशासनाने पुढील दहा दिवसात ठोस कार्यवाही केली नाही, तर काँग्रेसच्यावतीने बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या कंत्राटदाराला पाठीशी घालू नये, अन्यथा आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur janala pombhurna road work quality controversy congress 10 day ultimatum indefinite hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा
1

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा

औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ
2

औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव
3

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
4

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.