
Chandrapur News: भाजपसमोर काँग्रेसचे आव्हान! निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग
Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष
चंद्रपूर महापालिका २०१२ मध्ये अस्तित्वात आली. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने बहुमतांसह विजय संपादन केला. पहिल्या महापौर काँग्रेसच्या संगीता अमृतकर होत्या. मात्र, २०१४ मध्ये काँग्रेसच्या ११ नगरसेवकांनी बंडखोरी केली. परिणामी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या राखी कंचलांवार यांची महापौरपदी वर्णी लागली. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ३६ यात २० महिला नगरसेवक होत्या, तर काँग्रेसचे अवघे १२ नगरसेवक निवडून आले. (फोटो सौजन्य – Pinterest)
भाजपने अंजली घोटेकर यांना अडीच वर्षे महापौर होण्याची संधी दिली. घोटेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा कंचर्लावार यांची वर्णी लागली. कंचर्लावार यांचा अडीच वर्षांचा हा कार्यकाळ वादग्रस्त राहिला.
सध्या खा. प्रतिभा धानोरकर व विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्यात दिलजमाई झाली आहे. मात्र, त्यांच्यासाठी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसने निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) व शिवसेना (शिंदे) या पक्षांसोबत केलेली युती अडचणीची ठरणार आहे. शिवसेना उबाठा, मनसे, वंचित तथा राष्ट्रवादी (श.प.) हे पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होतात की स्वतंत्र लढतात, हे पाहणेही ऊत्सुक्याचे ठरणार आहे.
गिरगावकरांच्या हक्कासाठी मंत्री Mangal Prabhat Lodha आक्रमक; म्हणाले, “सैफी हॉस्पिटलची मनमानी…”
यंदा महापालिकेतील राजकीय चित्र वेगळे आहे. २०१७ पर्यंत महापालिकेत माजी मंत्री तथा भाजपचे आ. सुधीर मुनगंटीवार (गुरू) यांचा दबदबा होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर आ. किशोर जोरगेवार (शिष्य) यांच्या गटाचे वर्चस्व आहे. या गुरू शिष्याचा संघर्ष सुरूच असतांना दोन्ही गटांत संभ्रमाचे वातावरण आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे देखील सक्रिय आहेत. त्यामुळे भाजप पक्ष ३ गटांत विखुरला आहे. मुनगंटीवार यांनी सलग दोनवेळा महापौरपद दिल्यानंतरही कंचलर्लावार दाम्पत्याने जोरगेवार यांचा हात पकडला आहे. जोरगेवार यांची यंग चांदा ब्रिगेड भाजपमध्ये विलीन झाली आहे. त्यामुळे उमेदवारीवरून भाजपमध्ये टोकाच्या संघर्षांची दाट शक्यता आहे.