मंत्री मंगल प्रभात लोढा (फोटो- सोशल मीडिया)
गिरगावकरांच्या हक्कासाठी मंत्री लोढा यांचे आंदोलन
केळेवाडी पुल होणारच – मंगल प्रभात लोढा
मंत्री लोढा गिरगावकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार
मुंबई: गिरगावकरांच्या सुविधेत बाधा ठरणाऱ्या सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही. चर्नी रोड केळेवाडी पुल पूर्णत्वास गेल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी परखड भूमिका कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडली आहे. गिरगावकरांनी (Mumbai) सैफी हॉस्पिटल समोर सोमवारी संध्याकाळी केलेल्या आंदोलनात मंत्री लोढा सहभागी झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सैफी हॉस्पिटल प्रशासनाच्या मनमानीचा पाढाच वाचला.
गिरगाव मधील चर्नी रोड ते केळेवाडी पर्यंत पुल व्हावा, यासाठी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गेली तीन वर्ष सातत्याने लढा दिला आहे. प्रशासकीय पातळीवर मुंबई महापालिका तसेच पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल प्रशासनाशीही त्यांनी बैठका घेतल्या आहेत. मुंबई महापालिकेकडे या पुलाचा पाठपुरावा करून मंत्री लोढा यांनी पालिकेकडून मान्यता मिळवली. त्यासाठी निधीची तरतूद देखील झाली. मात्र सैफी हॉस्पिटलने या पुलाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली.
“दबाव किंवा धमक्या देण्यासाठी…”; बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर प्रकरणात Mangal Prabhat Lodha आक्रमक
न्यायालयाने गिरगावकरांच्या प्रश्नाची दखल घेऊन मुंबई महपालिकेला पूल बांधण्यास परवानगी दिली. पालिकेने पुलाचे कामही सुरू केले. पुलाचे ६० टक्के काम पूर्ण होत असतानाच, पुन्हा सैफी हॉस्पिटल प्रशासनाने यात अडवणूक केली आहे. या विरोधात गिरगावकरांनी केलेल्या आंदोलनात मंत्री लोढा यांनी सक्रिय सहभाग घेऊन गिरगावकरांच्या पाठीशी ठामपणें उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दरम्यान, स्थानिकांना कोणतीही सूचना न देता आता या पुलाचे काम थांबवण्यात आले आहे. यासंदर्भात मंत्री लोढा यांनी पालिका मुख्यालयात बैठक घेऊन सह आयुक्त चंद्रशेखर चोरे यांना याचा जाब ही विचारला होता. मात्र त्यांनी असमाधानकारक उत्तर देऊन उडवाउडवीची उत्तरे दिली. पालिकेने कोणाच्याही दबावाखाली न येता न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा पुलाचे काम सुरू करावे, असे आदेश मंत्री लोढा यांनी दिले आहेत. तसेच जो पर्यंत पुलाचे काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत याचा पाठपुरावा करतच राहणार असल्याचा निर्धार मंत्री लोढा यांनी या आंदोलना नंतर दिला.
राज्यातील सर्व राजकीय पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतात; भाजपच्या नेत्याची कबुली, चर्चांना उधाण
बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर प्रकरणात मंत्री लोढा आक्रमक
कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज मालाड-मालवणी येथे के.इ.एम. नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली म्हणून या रुग्णालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल असे नाव देण्याची सूचना मंत्री लोढा यांनी केली.






