Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपुरात 6.57 लाख पशुधनाचे लसीकरण पूर्ण; संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाळ्यात पशुधनाचे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करण्यासाठी राबविण्यात आलेली विशेष लसीकरण मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील लाखो जनावरांना लसीकरणाचे संरक्षण मिळाले असून पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना वेळेवर लसीकरण आणि योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 26, 2026 | 01:28 PM
Chandrapur News: चंद्रपुरात 6.57 लाख पशुधनाचे लसीकरण पूर्ण; संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण

Chandrapur News: चंद्रपुरात 6.57 लाख पशुधनाचे लसीकरण पूर्ण; संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूर जिल्ह्यात विशेष मोहिमेद्वारे 6 लाख 57 हजार 644 जनावरांचे संसर्गजन्य आजारांविरुद्ध लसीकरण पूर्ण करण्यात आले.
  • बीक्यू आणि एचएस लसीकरणात 98% तर ईटीव्ही लसीकरणात 97% उद्दिष्ट पूर्ण झाले असून काही तालुक्यांनी 100% कामगिरी नोंदवली.
  • पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना गोठ्याची स्वच्छता राखून आजाराची लक्षणे दिसताच तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
चंद्रपूर: पावसाळ्यात पशुधनामध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने राबविलेली विशेष लसीकरण मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. जिल्ह्याला उपलब्ध झालेल्या लसींच्या आधारे गाय, म्हैस, शेळ्या व मेंढ्यांचे व्यापक लसीकरण करण्यात आले असून या मोहिमेतील सर्व नोंदी नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (एनडीएलएम) पोर्टलवर नोंदविण्यात आल्या आहेत. या अभियानामुळे जिल्ह्यातील एकूण ६ लाख ५७हजार ६४४ जनावरांना लसीकरणाचे कवच मिळाले, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे यांनी नवराष्ट्रशी बोलतांना दिली.

Raigad News: पेणच्या बळीराजाला दिलासा; महापुरानंतर पावसाची साथ, भातशेतीत पुन्हा आशेचा अंकुर

पशु संवर्धन विभागातर्फे जिल्ह्यात एकूण ६ लाख ७१ हजार लसमात्रांचा पुरवठा करण्यात आला. त्यामध्ये (घटसर्प) एचएस १,४०,०००, बीक्यू (एकटांग्या) १,५०,००० आणि ईटीव्ही (आंत्रविषार) २ लाख ७० हजार लसींचा समावेश होता. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन पशुपालकांच्या दारात लसीकरण पूर्ण केले. त्यामुळे पावसाळ्यात पशुधनाला होणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, असेही डॉ कुंभरे म्हणाले.

चंद्रपूर जिल्ह्यात २,५५,७४७ गाई, ५०,१८१ म्हशी, २,७७,५७३ शेळ्या आणि ७४, १४३ मेंढ्या आहेत. या पशुधनाच्या संरक्षणासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत बीक्यू आणि एचएस लसीकरणात प्रत्येकी ९८ टक्के, तर ईटीव्ही लसीकरणात ९७ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले, जिवती, पोंभूर्णा आणि वरोरा तालुक्यांनी काही लसीकरण प्रकारांत १०० टक्के कामगिरी नोंदविली असून नागभीड तालुक्यात ईटीव्ही लसीकरण ९९.७८ टक्के झाले आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

Mira-Bhayandar News: जागतिक कांदळवन दिनी भाईंदरमध्ये तरुणांचे स्वच्छता अभियान; शासकीय विभाग मात्र गैरहजर

पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

गोठा स्वच्छ, कोरडा व हवेशीर ठेवणे, चिखल व साचलेले पाणी टाळणे, स्वच्छ पिण्याचे पाणी व संतुलित हिरवा कोरडा चारा उपलब्ध करून देणे, नियमित जंतनाशक औषधोपचार करणे आणि ताप, तोंडातून लाळ गळणे, पाय सुजणे किंवा भूक मंदावणे यांसारखी लक्षणे दिसताच तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे विभागाने सांगितले आहे. वेळेवर लसीकरणासह योग्य व्यवस्थापन केल्यास पशुधनाचे आजार व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येणार आहे. त्यामुळे जनावरांचे लसीकरण त्वरित करा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur news over 6 lakh 57 thousand livestock vaccinated in special monsoon drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

कोटींचे मालक आहेत भारताचे नवे शिक्षण मंत्री! प्रतिज्ञापत्रातील आकडेवारीतून समोर आली Pralhad Joshi यांची संपत्ती
1

कोटींचे मालक आहेत भारताचे नवे शिक्षण मंत्री! प्रतिज्ञापत्रातील आकडेवारीतून समोर आली Pralhad Joshi यांची संपत्ती

Raigad News: पेणच्या बळीराजाला दिलासा; महापुरानंतर पावसाची साथ, भातशेतीत पुन्हा आशेचा अंकुर
2

Raigad News: पेणच्या बळीराजाला दिलासा; महापुरानंतर पावसाची साथ, भातशेतीत पुन्हा आशेचा अंकुर

आंदोलन संपताच दिल्ली मेट्रोची मोठी घोषणा; 3 स्थानके पुन्हा सुरू, 15 अद्याप बंद
3

आंदोलन संपताच दिल्ली मेट्रोची मोठी घोषणा; 3 स्थानके पुन्हा सुरू, 15 अद्याप बंद

Mira-Bhayandar News: जागतिक कांदळवन दिनी भाईंदरमध्ये तरुणांचे स्वच्छता अभियान; शासकीय विभाग मात्र गैरहजर
4

Mira-Bhayandar News: जागतिक कांदळवन दिनी भाईंदरमध्ये तरुणांचे स्वच्छता अभियान; शासकीय विभाग मात्र गैरहजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.