
Chandrapur News: चिमूरच्या फुटपाथवर विद्युत खांबांचा अडथळा; अपघाताचा धोका वाढला, महावितरण आणि PWD च्या कारभारावर प्रश्नचिन्ह
शहरातील राज्य मार्गांवर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. अवजड वाहनांसह दुचाकी आणि चारचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. अनेक वाहनांचा वेगही अधिक असतो. अशा परिस्थितीत पादचारी मार्गावरील विद्युत खांब आणि लोखंडी सांगाडे अडथळा ठरत आहेत. परिणामी, पादचाऱ्यांना सुरक्षित मार्ग सोडून थेट वाहनांच्या गर्दीतून वाट काढावी लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. वीज यंत्रणा उभारताना पादचारी मार्गाचा विचार करण्यात आला होता का? मार्गावर असे अडथळे कायम ठेवण्यास परवानगी कशी देण्यात आली? या खांबांची सुरक्षितता तपासण्याची जबाबदारी कोणाची? असे प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत.
महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे की, संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा संतापही व्यक्त होत आहे. पादचारी मार्ग हा नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी असतो; मात्र त्यावरच अडथळे निर्माण झाल्याने या मार्गाचा उपयोग तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे.
Mira Bhayandar News: महासभेतील गोंधळ रोखण्यासाठी SOP; पण त्याच नियमावलीवरून महासभेतच रणकंदन!
नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न गांभीयांने घेण्याची गरज आहे. महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करून पादचारी मार्गावरील विद्युत खांब व लोखंडी सांगाड्यांमुळे निर्माण झालेले अडथळे तातडीने दूर करावेत. तसेच पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता येईल, अशी व्यवस्था करावी. अन्यथा संबंधित विभागांच्या दुर्लक्षामुळे एखाद्या निष्पाप नागरिकाला जीव गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.