Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: मूल तलावावर मालधक्का प्रकल्पाचे सावट; पर्यावरण आणि ढिवर समाजाच्या उपजीविकेवर संकट

चंद्रपूरच्या मूल शहरातील ऐतिहासिक तलावावर प्रस्तावित मालधक्का प्रकल्पामुळे स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणासोबतच ढिवर समाजाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 26, 2026 | 10:56 AM
Chandrapur News: मूल तलावावर मालधक्का प्रकल्पाचे सावट; पर्यावरण आणि ढिवर समाजाच्या उपजीविकेवर संकट

Chandrapur News: मूल तलावावर मालधक्का प्रकल्पाचे सावट; पर्यावरण आणि ढिवर समाजाच्या उपजीविकेवर संकट

Follow Us
Follow Us:
  • मालधक्का प्रकल्पामुळे तलावाचे प्रदूषण होऊन मत्स्य व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे.
  • ढिवर समाजातील शेकडो कुटुंबांची उपजीविका या तलावावर अवलंबून असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • नागरिकांनी पर्यावरण, रोजगार आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
चंद्रपूर: मूल शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक व विशाल तलावावर प्रस्तावित मालधक्का प्रकल्पाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे ढिवर समाजाच्या उपजीविकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. खनिज वाहतुकीसाठी मालधक्का उभारण्याच्या हालचालींमुळे तलावाचे पर्यावरण, मासेमारी व्यवसाय आणि शहराची सांस्कृतिक ओळख धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

Raigad News: गॅस सिलेंडर टंचाईने कर्जतकर हैराण! ग्रामीण नियमामुळे २५-४५ दिवसांची गॅसची प्रतीक्षा, उपोषणाचा इशारा

बसस्थानकाच्या शेजारी आणि गडचिरोली महामार्गालगत वसलेला हा तलाव शहराच्या सौंदर्यात भर घालणारा प्रमुख केंद्रबिंदू मानला जातो. या तलावावर अनेक मासेमार कुटुंबांचा पारंपरिक व्यवसाय अवलंबून आहे. मत्स्यपालन सोसायटीमार्फत मासेमारीचे हक्क देण्यात आले असून पिढ्यानपिढ्या ढिवर समाजातील कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो.

माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरात आयरन खनिज वाहतुकीसाठी मालधक्का सुरू करण्याबाबत निवेदन दिल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. नागरिकांच्या मते, मालधक्का सुरू झाल्यास तलावाच्या काठाने मोठ्या प्रमाणावर ट्रकची वाहतूक होईल. या ट्रकमधून उडणारी धूळ व खनिजकण तलावात मिसळल्यास पाणी प्रदूषित होऊन मत्स्यसंपत्तीला मोठा फटका बसू शकतो.

मत्स्य उत्पादन घटल्यास किंवा मासेमारी ठप्प झाल्यास ढिवर समाजातील शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. रोजगाराचा दुसरा पर्याय नसल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे स्थानिक मासेमारांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.

पर्यावरण, रोजगार जपण्याची मागणी

हा तलाव केवळ उपजीविकेचे साधन नसून शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा केंद्रबिंदूही आहे. येथे दरवर्षी गणेश विसर्जन, दुगां विसर्जन, शारदा विसर्जन आणि गौरी विसर्जन मोठ्या श्रद्धेने पार पडते. तलाव प्रदूषित झाल्यास या परंपरांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मासेमार समाजाने प्रशासनाने प्रस्तावाचा पुनर्विचार करून पर्यावरण, रोजगार आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची मागणी केली आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या अस्तित्वावर गदा येऊ नये, अशी भावना शहरात व्यक्त होत आहे.

मुंबईतील ९० टक्के रिक्षा थांबे गायब! संपूर्ण शहरात २.६० लाख रिक्षा, १८ हजार टॅक्सी; पण थांब्यांची संख्या फक्त ७२४

चंद्रपूरच्या मूल शहरातील ऐतिहासिक तलावावर मालधक्का प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावामुळे स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. या प्रकल्पामुळे तलावाचे प्रदूषण होऊन मासेमारी व्यवसाय आणि ढिवर समाजाच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, या तलावाशी जोडलेल्या सांस्कृतिक परंपरांनाही धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Proposed cargo depot threatens chandrapur lake livelihood and environment at risk chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
1

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
2

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
3

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट
4

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.