Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: १ ऑगस्टपासून एसटी सवलतींसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक; चंद्रपूरमध्ये लाभार्थ्यांची गर्दी

एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना १ ऑगस्ट २०२६ पासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक होणार आहे. या निर्णयानंतर चंद्रपूर जिल्ह्यात कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी एसटी आगारांमध्ये लाभार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 22, 2026 | 03:16 PM
Chandrapur News: १ ऑगस्टपासून एसटी सवलतींसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक; चंद्रपूरमध्ये लाभार्थ्यांची गर्दी

Chandrapur News: १ ऑगस्टपासून एसटी सवलतींसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक; चंद्रपूरमध्ये लाभार्थ्यांची गर्दी

Follow Us
Follow Us:
  • १ ऑगस्टपासून एसटी सवलतींसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक होणार आहे.
  • चंद्रपूरमध्ये 71 हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी कार्डसाठी नोंदणी केली आहे.
  • अजून 27 हजारांहून अधिक नोंदणीकृत लाभार्थ्यांना कार्ड मिळणे बाकी आहे.
चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध प्रवासी सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC), स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केल्यानंतर राज्यभरासह चंद्रपूर जिल्ह्यातही एनसीएमसी कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला. परिणामी जिल्ह्यातील एसटी आगारांमध्ये कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! पावसाच्या सरींनी बदललं वातावरण; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

यापूर्वी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि इतर सवलतधारक प्रवाशांना आधार कार्ड अथवा इतर ओळखपत्रांच्या आधारे तिकिटांमध्ये सवलत मिळत होती. मात्र, आता सवलतींचे वितरण अधिक पारदर्शक आणि डिजीटल पद्धतीने करण्यासाठी एनसीएमसी कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे. त्यामुळे १ ऑगस्टनंतर संबंधित लाभार्थ्यांना सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड आवश्यक ठरणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजार ६३३ प्रवाशांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली. यामध्ये ५४ हजार १११ महिला, ९ हजार ३६० ज्येष्ठ नागरिक, ७ हजार ३०७ अमृत ज्येष्ठ नागरिक तसेच ८५५ अन्य प्रवाशांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

नोंदणीची संख्या मोठी असली तरी सर्व लाभाथ्यर्थ्यांपर्यंत कार्ड पोहोचलेले नाही. जिल्ह्यात आजपर्यंत ४४ हजार १५२ लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डाचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये ३१ हजार ९२७ महिला, ६ हजार ७९४ ज्येष्ठ नागरिक, ४ हजार ९२३ अमृत ज्येष्ठ नागरिक आणि ५०८ इतर प्रवाशांचा समावेश आहे. यावरून अद्याप २७ हजार ४८१ नोंदणीकृत लाभार्थ्यांना कार्ड मिळणे बाकी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पुढील काही आठवड्यात कार्ड वितरण केंद्रांवरील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य स्तरावर पाहता, सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी – केली असून त्यापैकी २५ लाख कार्ड कार्यान्वित करण्यात आली. उर्वरित लाभार्थ्यांची कार्डही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक एनसीएमसी कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, एनसीएमसी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नसल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. जादा रक्कम आकारून कार्ड देणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच संबंधित केंद्रांचा परवाना रद्द करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai Rain: अखेर मुंबईकरांना दिलासा! ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंईबत पावसाचे आगमन

एसटीच्या सवलतीच्या योजनांचा लाभ सुरळीतपणे मिळण्यासाठी, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला डिजीटल स्वरूप देण्यासाठी एनसीएमसी प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकानी १ ऑगस्टपूर्वी आपले स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे. – छगन दिवसे, विभागीय नियंत्रक, चंद्रपूर

Web Title: Ncmc smart card mandatory for st travel concessions from august 1 rush increases at chandrapur depots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

सुपरस्टार असला तरीही कायदा महत्त्वाचाच; अल्लू अर्जुनने न्यायालयीन सुनावणीत घेतला सहभाग!
1

सुपरस्टार असला तरीही कायदा महत्त्वाचाच; अल्लू अर्जुनने न्यायालयीन सुनावणीत घेतला सहभाग!

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई Sarang Lakhani ? कोट्यवधींच्या बिझनेस ग्रुपचे वारस; इतकी आहे नेटवर्थ!
2

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई Sarang Lakhani ? कोट्यवधींच्या बिझनेस ग्रुपचे वारस; इतकी आहे नेटवर्थ!

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम
3

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम

LPG सिलेंडरच्या जाग्यावर आता इथेनॉलचे स्टोव्ह? तयारी जोमात, कंपन्या बनवणार इंधन, नेमका प्लॅन काय?
4

LPG सिलेंडरच्या जाग्यावर आता इथेनॉलचे स्टोव्ह? तयारी जोमात, कंपन्या बनवणार इंधन, नेमका प्लॅन काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.