Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: 15 किमीची पायपीट थांबवा, गावागावात सेतू केंद्र सुरू करा! नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

नागभीड तालुक्यातील वाढोणा, सावरगावसह परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावर सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. शासकीय दाखले आणि ऑनलाइन सेवांसाठी वारंवार तहसील कार्यालयात जावे लागत असल्याने ग्रामीण नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 11, 2026 | 01:59 PM
Chandrapur News: 15 किमीची पायपीट थांबवा, गावागावात सेतू केंद्र सुरू करा! नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

Chandrapur News: 15 किमीची पायपीट थांबवा, गावागावात सेतू केंद्र सुरू करा! नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

Follow Us
Follow Us:
  • शासकीय सेवांसाठी नागरिकांना 15 किमी दूर तहसील कार्यालयात जावे लागते.
  • ग्रामपंचायत स्तरावर सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
  • गावातच सेवा मिळाल्यास वेळ, पैसा आणि श्रमांची बचत होणार.
वाढोणा: नागभीड तालुक्यातील वाढोणा, सावरगावसह परिसरातील गावांची लोकसंख्या सहा हजारांहून अधिक आहे. तरीसुद्धा नागरिकांना विविध शासकीय सेवा मिळविण्यासाठी आजही १५ किलोमीटर अंतरावरील तहसील कार्यालयाची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या निकषानुसार प्रत्येक गावात किंवा किमान ग्रामपंचायत स्तरावर सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे केली.

हिंजवडी मेट्रोची पाचवी डेडलाईनही हुकणार; मुख्यमंत्र्यांच्या तंबीलाही वाटाण्याच्या अक्षता

सध्या उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, ई-श्रम नोंदणी, आधार अद्ययावतीकरण, विविध शासकीय योजनांचे अर्ज तसेच इतर ऑनलाइन सेवांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार जावे लागते. याचा सर्वाधिक फटका शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना बसत आहे. ग्रामीण भागातून तहसील कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासावर मोठा खर्च होत असून, दिवसभराचा वेळही वाया जातो. अनेकदा किरकोळ कामासाठी दोन ते तीन वेळा तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव नाराजी व्यक्त होत आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

नागरिकांच्या मते, लोकसंख्येनुसार प्रत्येक गावात किंवा ग्रामपंचायत स्तरावर सेतू केंद्र सुरू झाल्यास शासकीय सेवा गावातच उपलब्ध होतील. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांची बचत होण्याबरोबरच शासनाच्या डिजीटल सेवा अधिक प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन नागभीड तालुक्यात लोकसंख्या निहाय सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

  • लोकसंख्या निहाय प्रत्येक गावात किंवा ग्रामपंचायत स्तरावर सेतू केंद्र सुरू करावे.
  • शासकीय दाखले व ऑनलाइन सेवा गावपातळीवर उपलब्ध कराव्यात.
  • तहसील कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या थांबवून नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम वाचवावेत.
  • विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना गावातच सेवा मिळण्याची व्यवस्था करावी.
शासकीय सेवा नागरिकांच्या दारात पोहोचविण्याचा शासनाचा उद्देश असेल, तर प्रत्येक गावात किंवा ग्रामपंचायत स्तरावर सेतू केंद्र सुरू करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे तहसील कार्यालयावरील गर्दी कमी होईल आणि ग्रामीण नागरिकांची गैरसोयही दूर होईल. – खोजराम मरस्कोल्हे, माजी सदस्य जि.प.,चंद्रपूर

Mumbai BEST Bus Accident : मुंबईत पुन्हा भीषण अपघात! बेस्ट बसचे ब्रेक फेल? अंधेरीत १४ गाड्यांची एकमेकांना धडक, प्रवाशांमध्ये घबराट

ज्येष्ठ नागरिकांची शासकीय कामे गावातच झाली, तर मोठा तर मोठा दिलासा मिळेल. निराधार योजनेसह विविध कामांसाठी वारंवार तहसील कार्यालयात जावे लागते. क्योमानामुळे प्रवासाचा त्रास सहन करावा लागतो, गावातच सेतू केंद्र सुरू झाल्यास नागरिकांची मोठी सोय होईल.- बाबुराव येसनसुरे, ज्येष्ठ नागरिक, वाढोणा

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Residents demand setu service centres at village level to ease access to government services

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा
1

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा
2

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन
3

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!
4

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.