Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर

वाई तालुक्यातील दत्तनगर (पिराचीवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण भिंत उभारण्यासाठी आणि नुकसानग्रस्त भागाच्या दुरुस्तीसाठी तातडीने 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 11, 2026 | 02:39 PM
मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसामुळे दत्तनगर येथील जिल्हा परिषद शाळेमागे दरड कोसळून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
  • दरड कोसळल्याने शाळेतील शौचालय व किचनशेडचे मोठे नुकसान झाले असून आणखी पाऊस झाल्यास मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
  • प्रशासनाने तातडीने दखल घेत संरक्षण भिंत व दुरुस्तीच्या कामांसाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करून विद्यार्थ्यांची तात्पुरती मंदिरात व्यवस्था केली आहे.
वाई: वाई तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका दत्तनगर (पिराचीवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बसला आहे. डोंगरालगत असलेल्या शाळेच्या पाठीमागील उतार मोठ्या प्रमाणात खचल्याने मातीचा भराव, दगड-गोटे थेट शाळेच्या संरक्षण भिंतीजवळ येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Mumbai Gaming Zone : मुंबईतील सर्व मॉलमधील गेमिंग झोनची सुरक्षा तपासणार सरकार; मोठ्या घटनेनंतर महत्त्वाचा निर्णय

शौचालय व किचनशेडची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी

या दरडीमुळे शाळेतील मुला-मुलींच्या शौचालयाचे तसेच किचनशेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणखी पाऊस झाल्यास डोंगराचा अधिक भाग खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भावना पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शाळेच्या पाठीमागे तातडीने मजबूत संरक्षण भिंत उभारण्यात यावी, खचलेली माती व दगड-गोटे त्वरित हटवावेत, तसेच नुकसानग्रस्त शौचालय व किचनशेडची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या आपत्कालीन परिस्थितीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी आणि भविष्यातील संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी पिराचीवाडी ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते युवराज कोंढाळकर यांनी केली आहे. सदर ठिकाणी बातमीची दखल घेत या विभागाच्या बावधन जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या व महिला बालकल्याण सभापती शिंदे यांनी दखल घेत सभापती यांनी घटनास्थळी भेट दिली.

झाडे पडली, तर ठेकेदार जबाबदार! मुंबई महानगरपालिकेने हात झटकले; चेंबूर दुर्घटनेनंतर ५० पानी अहवाल सादर

यावेळी जिल्हा परिषद फंडातून तात्काळ 15 लाख रुपये मंजूर केले असून संरक्षण भिंतीसाठी आठ लाख रुपये, शौचालय – बाथरूमसाठी तीन लाख रुपये, पत्र्यासाठी तीन लाख रुपये असे 15 लाख रुपये तातडीने मंजूर करून हे काम तात्काळ चालू करण्याचे आदेश महिला बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे यांनी दिले व त्या शाळेतील विद्यार्थीना तात्पुरते मंदिरामध्ये बसण्याची व्यवस्था करण्याची सोय केली आहे. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी किरणकुमार मोरे, इंजिनिअर केदार गायकवाड, चंद्रकांत मांढरे, सर्जेराव कोंडके, युवराज कोंढाळकर, ग्रामपंचायत अधिकारी अनिता धायगुडे, शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Web Title: Landslide threatens zp school in wai15 lakh rupees sanctioned for safety measures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • maharashtra
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
1

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
2

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली
3

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
4

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.