Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! महागाई भत्ता 63% वर जाणार? नवीन आकडेवारीतून ‘इतक्या’ वाढीचे संकेत

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आठव्या वेतन आयोगाचा अहवाल येण्यास अजून काही काळ बाकी असताना त्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये महागाई भत्त्यातील वाढीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या कामगार ब्युरोने एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 11, 2026 | 12:46 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट!
  • महागाई भत्ता 63% वर जाणार?
  • नवीन आकडेवारीतून ‘इतक्या’ वाढीचे संकेत
DA Hike News Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आठव्या वेतन आयोगाचा अहवाल येण्यास अजून काही काळ बाकी असताना त्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये महागाई भत्त्यातील वाढीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या कामगार ब्युरोने एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे, जो महागाई भत्ता वाढ निश्चित करताना विचारात घेतला जाण्याची शक्यता आहे. औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ०.९ अंकांनी वाढला आहे. महागाई भत्त्याच्या गणनेसाठी हा आकडा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नेमका काय आहे आकडा आणि तो कशा प्रकारे कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचा ठरु शकतो? यासगळ्यात नेमकं कॅलक्युलेशन काय आहे सविस्तर जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेला मिळणार PM Kisan योजनेचा 24 वा हफ्ता, ‘ही’ चूक टाळा नाहीतर अडकतील 2000 रुपये

कसं होतं कॅलक्युलेशन?

एप्रिलपर्यंतच्या AICPI-IW आकडेवारीनुसार, किमान ३ टक्क्यांची महागाई भत्ता वाढ शक्य आहे. आता मे महिन्याची आकडेवारी जाहीर झाल्यामुळे, बदलाला फारसा वाव नाही. मार्चच्या तुलनेत, एप्रिलमध्ये AICPI-IW ०.८ अंकांनी वाढून १४९.९० वर पोहोचला. फेब्रुवारीमध्ये हा आकडा १४८.५० आणि जानेवारीमध्ये १४८.६० होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मे २०२६ मध्ये वार्षिक महागाई ४.७२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. महागाई भत्त्याची गणना करताना या आकडेवारीचा विचार केला जातो.

मे महिन्याचा AICPI-IW कसा होणार परिणाम?

सातव्या वित्त आयोगाच्या नियमांनुसार, जुलै महिन्याच्या महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी AICPI-IW हा आकडा महत्त्वपूर्ण मानला जातो.
महागाई भत्ता (DA) = [{(मागील महिन्याच्या १२ महिन्यांच्या AICPI-IW ची सरासरी x २.८८)−२६१.४१}/२६१.४१]×१०० – चालू महागाई भत्ता (%).
त्यामुळे महागाई भत्त्यात साधारण ३.७२ टक्के वाढ होऊ शकते. पण सरकार ही टक्केवारी जाहीर करताना पूर्णांकात जाहीर करत असल्याने ही वाढ 3 टक्क्यांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

मागच्या वेळेची वाढ २ टक्के

केंद्र सरकारने जानेवारी २०२६ साठी महागाई भत्त्यात (DA) २ टक्के वाढ जाहीर केली आहे, ज्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढेल. तथापि, जर यावेळी महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली, तर तो ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. हे लक्षात घ्यावे की केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवते. पहिली महागाई भत्ता वाढ होळीच्या आसपास जाहीर केली जाते. जुलै महिन्यातील महागाई भत्ता सहसा केंद्र सरकारकडून दिवाळीच्या आसपास जाहीर केला जातो.

सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू असतानाच लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष जुलै 2026 च्या महागाई भत्ता वाढीकडे लागले आहे. आगामी महिन्यांतील अंतिम आकडेवारी आणि केंद्र सरकारचा निर्णय यावरच DA वाढीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

EPFO Pension: आता टेन्शन नाही… लागू झाली नवी EPS स्कीम, 10 वर्षांच्या नोकरीनंतर किती मिळणार पेन्शन?

Web Title: Important update for central government employees will dearness allowance rise to 63 new data indicates a hike of this magnitude

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • 8th pay commission
  • Business News
  • Central government
  • Dearness Allowance
  • Marathi News
  • Salary Hike

संबंधित बातम्या

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे
1

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे

High Court on Aashirvaad Atta : तुम्हीही ‘आशीर्वाद’ आटा वापरता? दिल्ली हायकोर्टाकडून मोठी बातमी; दिला मोठा निर्णय?
2

High Court on Aashirvaad Atta : तुम्हीही ‘आशीर्वाद’ आटा वापरता? दिल्ली हायकोर्टाकडून मोठी बातमी; दिला मोठा निर्णय?

Infection Before Organ Transplant: इन्फेक्शन झालंय? ऑर्गन ट्रान्सप्लांट थांबू शकतो का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत
3

Infection Before Organ Transplant: इन्फेक्शन झालंय? ऑर्गन ट्रान्सप्लांट थांबू शकतो का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत

Bhau Kadam: भाऊ कदम पुन्हा रंगभूमीवर! ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’चा पुण्यात रंगणार पहिला प्रयोग
4

Bhau Kadam: भाऊ कदम पुन्हा रंगभूमीवर! ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’चा पुण्यात रंगणार पहिला प्रयोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.