Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगारात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ड्युटी व्यवस्थापन, रजा मंजुरी आणि कथित दबावाच्या आरोपांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 17, 2026 | 08:33 AM
Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती

Follow Us
Close
Follow Us:
  • चंद्रपूर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी प्रशासनावर पक्षपाती ड्युटी वाटप आणि रजा नाकारल्याचे आरोप केले आहेत.
  • कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत असल्याची माहिती समोर येत असून आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे.
  • एसटी प्रशासनाने मात्र प्रवासी सेवांचे नियोजन बिघडू नये म्हणून नियमांनुसारच सुट्या दिल्या जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगारात सध्या प्रशासनाच्या कथित मनमानी कारभारामुळे कर्मचारी वर्गात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांशी अन्यायकारक वागणूक, ड्युटी व्यवस्थापनातील कथित पक्षपात, सुट्या मंजूर करण्यात होणारा अडथळा तसेच आर्थिक व्यवहारांच्या चर्चामुळे आगारातील वातावरण ढवळून निघाले. अनेक कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी

आगारातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांशी कठोर आणि दबावाचे धोरण अवलंबत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. एखाद्या कर्मचाऱ्याची तब्येत बिघडल्यास किंवा वैद्यकीय कारणास्तव रजेचा अर्ज दिल्यास तो तातडीने मंजूर न करता संबंधित कर्मचाऱ्यांवर ‘कामावर हजर राहावेच लागेल’ असा दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. काही कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करूनही सुटी नाकारण्यात आल्याचा आरोप केला. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ड्युटी नंबर वाटपामध्येही पारदर्शकता राहत नसल्याने नाराजी वाढत आहे. काही मोजक्या कर्मचाऱ्यांना सोयीचे नंबर व वेळापत्रक दिले जात असून, इतर कर्मचाऱ्यांना वारंवार गैरसोयीच्या फेऱ्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाण होत असल्याच्या चर्चामुळे वातावरण अधिकच तापले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

अधिकृतरित्या याबाबत कोणतीही पुष्टी नसली तरी आगार परिसरात या चर्चाना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, नुकतेच रुजू झालेले काही अधिकारी एसटी प्रशासनाला खाजगी संस्था समजून वागत असल्याचा आरोपही कर्मचारी वर्गातून होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना दबावाखाली ठेवले जात असल्याने कर्मचारी मानसिक त्रास सहन करत असल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘कर्मचाऱ्यांशी संवादाऐवजी आदेश आणि दवावाचे वातावरण निर्माण केले जात आहे,’ अशी माहिती काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

दोषींवर कारवाईची मागणी

चंद्रपूर आगार हे जिल्ह्यातील महत्त्वाचे एसटी केंद्र मानले जाते. दररोज हजारो प्रवासी या आगारातून प्रवास करत असतात. अशा परिस्थितीत प्रशासनातील अंतर्गत तणाव आणि कर्मचारी असंतोष वाढल्यास त्याचा थेट परिणाम प्रवासी सेवांवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कर्मचारी वर्गाकडून प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, दोषींवर कारवाई करावी आणि कामकाजात पारदर्शकता आणावी, अशी मागणी केली. अन्यथा येत्या काही दिवसांत आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फलटणच्या श्रीराम कारखान्याबाबत मोठा निर्णय; जवाहर कारखान्यासोबतचा करार रद्द होणार? 18 मे रोजी फैसला

सद्या लग्न सराईचे दिवस आहे. त्यामुळे बसची बुकिंग असते. लोकाना गाड्या द्याव्या लागतात. याशिवाय उन्हाळ्यात बस फेऱ्याची वाढ होते. चालक व वाहकाचा रजा कोटा असतो. त्यानुसार सुट्या दिल्या जातात. त्या कोटयापेक्षा जास्त रजा दिल्यातर बस फेऱ्यांचे नियोजन बिघडते. त्यांनी आपले कर्तव्य समजून घेतले पाहिजे. सर्वांना सुटी दिल्यातर प्रवाश्यांच्या सेवेचे काय? कर्मचाऱ्यांच्या तक्रारीत तथ्य नाही.- छगन दिवसे, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ, चंद्रपूर.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Tension rises at chandrapur st depot amid staff protest allegations passenger services may be affected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी
1

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी

Palghar News :  खोटे मृत्यू दाखले , ग्रामपंचायतची खोटी कागदपत्र, खोट्या सह्या करून परस्पर विक्री
2

Palghar News : खोटे मृत्यू दाखले , ग्रामपंचायतची खोटी कागदपत्र, खोट्या सह्या करून परस्पर विक्री

फलटणच्या श्रीराम कारखान्याबाबत मोठा निर्णय; जवाहर कारखान्यासोबतचा करार रद्द होणार? 18 मे रोजी फैसला
3

फलटणच्या श्रीराम कारखान्याबाबत मोठा निर्णय; जवाहर कारखान्यासोबतचा करार रद्द होणार? 18 मे रोजी फैसला

Buy vs Rent: घर घेणं फायद्याचं की भाड्याने राहणं? काय आहे रिअल इस्टेटचा 1% Rule, जो वाचवू शकतो तुमचे लाखो रुपये!
4

Buy vs Rent: घर घेणं फायद्याचं की भाड्याने राहणं? काय आहे रिअल इस्टेटचा 1% Rule, जो वाचवू शकतो तुमचे लाखो रुपये!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.