Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: बल्लारपूर तालुक्यात वाघाची दहशत कायम, तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

कोठारी वनपरिक्षेत्रालगतच्या शेतशिवारात वाघाच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 26, 2025 | 12:04 PM
Chandrapur News: बल्लारपूर तालुक्यात वाघाची दहशत कायम, तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Chandrapur News: बल्लारपूर तालुक्यात वाघाची दहशत कायम, तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • वाघाच्या सतत हालचालींमुळे बल्लारपूर हादरलं!
  • ग्रामस्थ भयभीत, तात्काळ बंदोबस्ताची जोरदार मागणी
  • बल्लारपूरमध्ये वाघाच्या दहशतीने तणावाचं वातावरण
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी वनपरिक्षेत्रालगतच्या शेतशिवारात मागील पंधरा दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार सुरू आहे. यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामस्थांची बैठक पार पडली होती. या बैठकीत वनविभागाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. बैठकीत वाघाच्या तात्काळ बंदोबस्ताची मागणी देखील करण्यात आली. यावेळी वाघाने शेतात चरणाऱ्या दोन बैलांवर हल्ला करून त्यांना ठार मारल्याची घटना देखील घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Mumbai Local: आता लोकलबाहेर लटकणे विसरा, ट्रेनच्या दरवाज्याच्या पन्हाळीत बदल करण्यास सुरुवात

वनविभागाने कारवाई न केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलांसमोर अचानक वाघ दिसताच, त्यांनी काम अर्धवट सोडून माघार घेतली. वाघ शेतातच वावरत असल्याचे ट्रॅप कॅमेरा व ड्रोनद्वारे स्पष्ट झाले आहे. मात्र तरी देखील वनविभागाने तात्काळ ठोस कारवाई न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर उपसरपंच सुनील फरकडे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. (फोटो सौजन्य – Pinterest)

ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

आमदारांनी तातडीने हस्तक्षेप करीत वनविभाग व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी (दि. २३) रात्री कोठारी वन कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांचे स्वीय सहायक संतोष अकतरे, सहायक उपवनसंरक्षक आदेशकुमार शेडगे, कोठारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेखा मुरकुटे, बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे उपस्थित होते. बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला.

महिलांसह शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना सुरु

वन अधिकाऱ्यांनी वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आल्याची माहिती देत परिसरात दिवसरात्र गस्त सुरू असल्याचे सांगितले. वाघाला शेतशिवारातून दूर ठेवण्यासाठी आठ ते दहा भोंगे बसविण्यात आले असून, ट्रॅप व ड्रोन कॅमेरांच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या बैलांची नुकसानभरपाई तत्काळ दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. शेतात काम करणाऱ्या महिलांसह शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत असून ग्रामस्थांनी संयम बाळगून वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.

Maharashtra Politics: मुंबई महापालिकेसाठी एकत्र येताच मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा शिलेदार फुटला

कडाक्याच्या थंडीत वनकर्मचाऱ्यांची गस्त

मनुष्यबळ कमी असतानाही कडाक्याच्या थंडीत वनकर्मचारी जीव धोक्यात घालून गस्त घालत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीला उपसरपंच सुनील फरकडे, सुरेश रंगारी, ग्रामपंचायत सदस्य किशोर कोटरंगे, संतोष लोनगाडगे, अनिल विरुटकर, शंकर भटास्कर, गुरू यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Tiger terror in ballarpur taluka villagers demand immediate action chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • tiger

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.