आता लोकलबाहेर लटकणे विसरा, ट्रेनच्या दरवाज्याच्या पन्हाळीत बदल करण्यास सुरुवात
मुंब्रा स्थानक परिसरात ९ जून रोजी कसारा सीएसएमटी आणि सीएसएमटी-कर्जत लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू आणि आठ प्रवासी जखमी झाले होते. दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी मध्य रेल्वेने पाच वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने दुर्घटना टाळण्यासाठी तात्काळ आणि दीर्घकालीन शिफारसी केल्या आहेत. गर्दीमुळे आणि लोकलचे दरवाजे बंद नसल्याने प्रवासी फूटबोर्डवरून प्रवास करतात. फूटबोर्डवरून प्रवास करणे धोकादायक आहे. यामुळेच अपघात घडल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे. प्रवाशांचे वाढते मृत्यू रोखण्यासाठी आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून देखरेख आणि प्रवासी वर्तणुकीत बदल अपेक्षित असल्याचेही समितीने स्पष्ट केले होते. त्यानुसार प्रवासी दरवाज्यात लटकू नयेत यासाठी पन्हाळी बदलण्यात येत आहेत.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतील पनवेल-खांदेश्वर रेल्वे मार्गावर एक भयानक घटना घडली. ५० वर्षीय शेख अख्तर नवाजने महिलांच्या डब्यात घुसून १८ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला वादाच्या वेळी ढकलले. विद्यार्थिनी ट्रेनमधून खाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली. अधिकाऱ्यांची तात्काळ कारवाईघटनेनंतर रेल्वे पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपी खांदेश्वर स्थानकावर उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु जागरूक प्रवाशांनी त्याला रोखले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पनवेल रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय रेल्वे कायद्याच्या विविध कलमांखाली आणि बीएनएसच्या कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. विद्यार्थिनीच्या डोक्याला, कंबरेला आणि हाताला आणि पायांना गंभीर दुखापत झाली आहे. ृ रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. जखमी विद्यार्थिनीने धाडस दाखवत तातडीने तिच्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवाशांनी सतर्कता दाखवली.






