Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात CSIR-NCL मध्ये भरती सुरू! ७ डिसेंबरपर्यंत करता येईल ऑनलाइन अर्ज; किती मिळणार मानधन?

CSIR-NCL Pune Bharti 2026: पुण्यातील CSIR-नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) मध्ये 'प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट'च्या २ तात्पुरत्या पदांसाठी भरती जाहीर झाली असून, पात्र उमेदवारांना ७ डिसेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 21, 2026 | 11:49 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • ‘प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट’ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू
  • प्रकल्पाचा तपशील आणि रिक्त पदे
  • शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कौशल्ये
CSIR NCL Pune Bharti 2026: पुण्यातील ‘सीएसआयआर-नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’ (CSIR-NCL) मध्ये ‘प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट’ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पॉलिमर सायन्स अँड इंजिनिअरिंग (PSE) विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रायोजित प्रकल्पासाठी ही तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती केली जाणार असून, यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

प्रकल्पाचा तपशील आणि रिक्त पदे

‘Unravelling the Structural Basis of Ductility and Brittleness in Amorphous Solids under Shear via Mean-Field Softness Theory’ या शीर्षकाच्या CSIR प्रायोजित प्रकल्पासाठी एकूण २ जागा रिक्त आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹४९,००० + HRA एकत्रित मानधन दिले जाईल. या पदासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे निश्चित करण्यात आली असून, SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांना ५ वर्षे व OBC उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादा शिथिलता लागू राहील.

India First Deeptech U-Hub: देशातील पहिला डीपटेक यू-हब उभारला जाणार ‘या’ शहरात; सरकारने मंजूर केला २८१ कोटींचा निधी

शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कौशल्ये

उमेदवाराकडे नॅचरल, ॲग्रिकल्चरल, फार्मास्युटिकल सायन्सेस, MVSc किंवा ॲनिमल सायन्सेसमध्ये मास्टर्स/इंटिग्रेटेड मास्टर्स पदवी किंवा इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अथवा मेडिसिनमधील बॅचलर पदवीसह संशोधन व विकासाचा ६ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. पर्यायी पात्रतेनुसार, इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमधील मास्टर्स/इंटिग्रेटेड मास्टर्स पदवी अथवा सायन्स/फार्मा/MD/MS मधील डॉक्टरेट पदवीसह ३ वर्षांचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. उमेदवारांना स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सचे चांगले ज्ञान आणि FORTRAN किंवा इतर संगणकीय भाषांमध्ये कोडिंग येणे आवश्यक असून, सुपरकूल्ड लिक्विड्समधील मॉलिक्युलर डायनॅमिक्स सिम्युलेशनचा अनुभव प्राधान्याचा मानला जाईल.

SSC Recruitment 2026: : SSC मध्ये ‘या’ पदांवर विभागीय भरती; कशी असेल निवड प्रक्रिया आणि अर्जाची मुदत?

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

पात्र उमेदवारांनी केवळ (https://jobs.ncl.res.in) या संकेतस्थळावरून ७ डिसेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. अधिक माहिती (https://www.ncl-india.org) वरील ‘Jobs Vacancies’ विभागात उपलब्ध आहे. अर्जासोबत JPG/JPEG फॉरमॅटमध्ये फोटो (५० KB पेक्षा कमी) व सही (२५ KB पेक्षा कमी) तसेच सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांची PDF प्रत जोडावी. मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी ८ डिसेंबर २०२६ रोजी संकेतस्थळ आणि विभागीय नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली जाईल, तर ऑनलाइन मुलाखती १० डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजल्यापासून घेतल्या जातील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: CSIR-NCL पुण्यातील भरतीत कोणत्या पदासाठी आणि किती जागा आहेत?

    Ans: पॉलिमर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागांतर्गत प्रकल्पासाठी 'प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट' या पदाच्या एकूण २ जागा आहेत.

  • Que: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि मुलाखतीची तारीख कोणती आहे?

    Ans: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०२६ असून, शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची ऑनलाइन मुलाखत १० डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजल्यापासून घेतली जाईल.

  • Que: निवड झालेल्या उमेदवारांना किती मानधन दिले जाईल?

    Ans: निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹४९,००० + HRA असे एकत्रित मानधन दिले जाईल.

Web Title: Csir ncl pune bharti 2026 principal project associate recruitment marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • chemical
  • Job
  • Marathi News

संबंधित बातम्या

India’s Top Philanthropists 2026: अंबानी-अदानींनाही टाकलं मागे! देशातील सर्वात मोठा दानशूर उद्योगपती कोण?
1

India’s Top Philanthropists 2026: अंबानी-अदानींनाही टाकलं मागे! देशातील सर्वात मोठा दानशूर उद्योगपती कोण?

Gaza News : हिवाळी पावसाने गाझातील विस्थापितांचे हाल; हजारो तंबू पाण्याखाली, दीड लाखांहून अधिक तंबू सीमेवर अडकले
2

Gaza News : हिवाळी पावसाने गाझातील विस्थापितांचे हाल; हजारो तंबू पाण्याखाली, दीड लाखांहून अधिक तंबू सीमेवर अडकले

World News : हंगेरीला पुन्हा फुटबॉल महासत्ता बनवण्याचे स्वप्न; फुटबॉलवेड्या पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी मोहीम
3

World News : हंगेरीला पुन्हा फुटबॉल महासत्ता बनवण्याचे स्वप्न; फुटबॉलवेड्या पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी मोहीम

World News : एपस्टीनला रशिया का आवडायचा? महिला ,अब्जाधीश आणि पुतिनपर्यंत पोहोचण्याची महत्वाकांक्षा; धक्कादायक खुलासे
4

World News : एपस्टीनला रशिया का आवडायचा? महिला ,अब्जाधीश आणि पुतिनपर्यंत पोहोचण्याची महत्वाकांक्षा; धक्कादायक खुलासे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.