
Chandrapur News: टाकीचे बांधकाम पूर्ण, मात्र पाणी मिळेना! मासाळा तुकुमला पाण्याची प्रतीक्षा, ग्रामस्थ संतापले
Raigad News: पेणमध्ये सत्तासमीकरण ढवळणार! भाजपाला कडवी झुंज, दोन्ही शिवसेना-शेकाप मैदानात
मासाळा तुकूम हे गाव दुर्गापूरनजीक कोळसा खदानींच्या कुशीत वसलेले आहे. या गावाच्या शेजारी लागून असलेल्या सिनाडा, मसाडा, नवेगांव या गावांचे वे. को. ली. द्वारे पुनर्वसन झाले. मात्र मसाळा तुकूमला अजूनही पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. अशातच गावकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकलेले आहे. मागील ३ वर्षांपासून जल-जीवन प्राधिकरणाअंतर्गत गावत सुमारे १५ हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी उभारण्यात आली आहे. मात्र मागील तीन वर्षापासून या टाकीत पाणी पोहचलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पूर्वी या गावची लोकसंख्या ६२६ एवढी होती. मात्र आता ती वाढून १ हजाराच्या जवळपास पोहचलेले आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढत चाललेली आहे. त्यामुळे नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आवासून उभा ठाकलेला आहे. केंद्र सरकारने ‘हर घर नल’ योजना सुरू केली असली तरी मसाळा तुकूमच्या नागरिकांचा घसा कोरडाच आहे. त्यामुळे आत ऐन उन्हाळ्याची चाहूल लागत असताना गावातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता प्रशासनाने तातडीने समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागलेली आहे.
गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण होत चाललेली आहे. गावामध्य पाण्यासाठी विहीर आहे. मात्र त्या विहीरीलाही पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलेली आहे. याबाबत पंचायत समीतीला अनेकदा निवेदन देऊनही पाण्याची समस्या सोडविण्यात आली नाही, हे गाव वेकोलिमुळे बाधित असून पुर्नवसनही झाले नाही. यातच पाण्याची समस्या, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. – आम्रपाली अलोणे, सरपंच, मासाळा तुकूम