नवनिर्वाचित नगरसेवक बेपत्ता; कल्याण डोंबिवली निवडणूक: पोस्टरबाजीची जोरदार चर्चा
नवनिर्वाचित नगरसेवक बेपत्ता
कल्याण डोंबिवली निवडणूक
पोस्टरबाजीची जोरदार चर्चा
कल्याण : कल्याण डोंबिवली २०२६ सार्वत्रिक निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या मशाल चिन्हावर तब्बल ११ उमेदवार निवडून आले. यात आतापर्यंत चार नगरसेवक १६ तारखेपासून नॉट-रिचेबल आहे. मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नील केणे अशी बेपत्ता नगरसेवकांची नावे असून राजकीय घाडामोडी पार्श्वभूमीवर भाजपा ५०, शिवसेना शिंदेगट ५३, काँग्रेस २, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट १, मनसे ५ आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष ११ असे पक्षीय बळाबळ असून सत्तासुदंरीच्या खुर्ची साठी राजकीय गणिते, राजकीय समीकरण, राजकीय घाडामोडी नाट्य पाहता या नाँट रिचेबल नगरसेवकांची भुमिका काय ? हे ते समोर आल्यानंतर नेमके कळेल पंरतु या बेपत्ता नगरसेवक प्रकरणी उबाठा गटाने नगरसेवकांचा शोध घ्यावा यासाठी पदाधिकाऱ्यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पोस्टर लावून नगरसेवकांचा शोध घेण्याचा आदेश दिल्याने कल्याण पूर्वेतील उबाठा पक्षाच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर पोस्टर चिटकवून बेपत्ता नगरसेवक आढळल्यास बाबत माहिती कोळसे वाडी शिवसेना शाखेत घ्यावी अशी मागणी पोस्टर बाजी करीत केल्याने राजकीय घाडामोडीत चांगलीच रगंत आली असल्याचे चित्र दिसत आहे.
उबाठा गटाची सोमवारी बैठक असून या बैठकीला या चारही नवनर्वचित बेपत्ता उबाठा पक्षाच्या उमेदवारांना हजर राहण्यासाठी मेल व्हॉटस् अॅप द्वारे मॅसेज पाठवला आहे. गटनेता उमेश बोरगावकर यांच्या व्हीपच्या अनुषंगाने त्यांना हजर राहणे बंधनकारक असून, गैहजर राहल्यास कायदेशीर निलंबन कारवाईचा बडगा अटळ आहे.
तसेच प्रसिध्दी माध्यामांना सामोरे जाता, उबाठा नेते वरूण सरदेसाई यांनी सांगितले असल्याचे समजते की, आम्ही विरोधी पक्षात बसू तसेच कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चार नगरसेवकानी अद्याप कोकण आयुक्तांकडे नोंदणी केलेली नाही. त्यामुळे आम्ही येत्या दोन-चार दिवसांत ‘व्हीप’ बजावणार आहोत. या काळात जर हे नगरसेवक गैरहजर राहिले, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल. या नाट्यमय राजकीय घडामोडी पाहता केडीएमसी मधील राजकीय नाटन चांगलेच तापले असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.






