Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amaravati: चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते धनुर्विद्या मैदानाचे लोकार्पण; सुवर्णपदक विजेत्या कुमकुम मोहोडचा केला सत्कार

Chandrashekhar Bawankule Inaugurated School of Scholars Archery Ground: अमरावतीच्या स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे नवनिर्मित धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 02, 2026 | 09:15 PM
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule

Follow Us
Follow Us:
  • अमरावतीत क्रीडा सुविधांचा विस्तार
  • स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन
  • कुमकुम मोहोडचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
अमरावती : कुमकुम मोहोड आणि यशदीप भोगे या धनुर्धरांसह, भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू भारती फुलमाळी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेल्या उच्च दर्जाच्या कामगिरीमुळे अमरावतीला जागतिक बहुमान मिळाला आहे. स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या धनुर्विद्या मैदानाहूनही असेच आंतरराष्ट्रीय स्तरावर या जिल्ह्याचे नाव झळकवणारे खेळाडू तयार होतील, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय धनुर्धर कुमकुम मोहोड यांची भेट घेऊन त्यांनी सत्कार केला.

Thane Unauthorized Stalls : ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगरसेविका आक्रमक; अनधिकृत टपऱ्या, रिक्षा आणि बेवारस वाहनांवर कारवाई

स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन

येथील निंभोरा खुर्द भागात स्थित स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये नव्याने निर्मित धनुर्विद्या मैदानावर पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रशिक्षित तिरंदाज विद्यार्थ्यांनी नेम धरला व औपचारिकरित्या फित कापून धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे,आमदार सर्वश्री प्रताप अडसळ, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, अग्निहोत्री गृप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव सचिन अग्निहोत्री, शाळेचे मुख्याध्यापक एन. संतोष कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले शालेय स्तरावर उत्तमोत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्याने या क्षेत्रात पुढे जाण्याची दालन उघडतात. स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या धनुर्विद्या मैदानाहून प्रशिक्षित होऊन जागतिक दर्जाचे खेळाडू घडतील. नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या खेळात अमरावतीच्या खेळाडूंचे यशाने ही बाब अधोरेखित झाल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा क्षेत्रातील उत्तम सुविधा व खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीने या जिल्ह्यातून येत्याकाळातही आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असेही त्यांनी सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक एन. संतोष कुमार यांनी स्वागतपर भाषण केले तर अग्निहोत्री गृप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव सचिन अग्निहोत्री यांनी प्रास्ताविक केले.

या शाळेचे माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय धनुर्धर यशदीप भोगे यांचे प्रशिक्षक गणेश विश्वकर्मा यांच्या उपस्थितीत यशदीप यांचे वडील संजय भोगे यांचा यावेळी श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पालकमंत्र्यांनी केला धनुर्धर कुमकुम मोहोडचा सत्कार

जपान येथे नुकत्याच आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या धनुर्धर कुमकुम मोहोड यांच्या साई नगर परिसरातील गोसावी कॉलनीत स्थित घरी जाऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचा सत्कार केला. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सर्वश्री प्रताप अडसळ, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, कुमकुम यांचे वडील अनिल मोहोड, आई रुपाली मोहोड आणि कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे यांनी यावेळी कुमकुम यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या व तिरंदाजीतील त्यांच्या प्रवासाविषयी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील यशासह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशाबाबत माहिती जाणून घेतली. ऑलिम्पिक स्पर्धेतही कुमकुम यांनी यश मिळवून देशाचे नाव उज्ज्वल करावे अशा अपेक्षा व्यक्त करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Satara News : सातारा बँक निवडणुकीत बोगस महिला निरीक्षकाचा शिरकाव; पोलिसांनी घेतले ताब्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमरावती येथे नव्याने बांधण्यात आलेल्या धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन कोणी केले?

    Ans: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या नवनिर्मित धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन केले.

  • Que: धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन कोणत्या शाळेत करण्यात आले?

    Ans: अमरावतीतील निंभोरा खुर्द येथे असलेल्या स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले.

  • Que: आंतरराष्ट्रीय धनुर्धर कुमकुम मोहोड यांचा सत्कार कोणी केला?

    Ans: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या आंतरराष्ट्रीय धनुर्धर कुमकुम मोहोडचा सत्कार केला.

Web Title: Chandrashekhar bawankule inaugurates archery ground amravati felicitated kumkum mohod pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 09:06 PM

Topics:  

  • Amaravati
  • archery
  • chandrakant bawankule

संबंधित बातम्या

Amravati News: साडेतीन वर्षांत ९ कोटींची फसवणूक! ९ महिन्यांत ३२ तक्रारी दाखल; ३२ गुन्ह्यांत ४ कोटींचा गंडा
1

Amravati News: साडेतीन वर्षांत ९ कोटींची फसवणूक! ९ महिन्यांत ३२ तक्रारी दाखल; ३२ गुन्ह्यांत ४ कोटींचा गंडा

Amravati News: एसएनए स्पर्श प्रणालीने मुख्याध्यापक त्रस्त! अनुदान खर्चाची प्रक्रिया सुलभ करण्याची शिक्षक समितीची मागणी
2

Amravati News: एसएनए स्पर्श प्रणालीने मुख्याध्यापक त्रस्त! अनुदान खर्चाची प्रक्रिया सुलभ करण्याची शिक्षक समितीची मागणी

Amravati News: चारा उत्पादनासाठी अनुदान! ४ हजार रुपयांपर्यंत चारा बियाण्यांसाठी तरतूद; बच्चू कडू यांच्या मागणीला यश
3

Amravati News: चारा उत्पादनासाठी अनुदान! ४ हजार रुपयांपर्यंत चारा बियाण्यांसाठी तरतूद; बच्चू कडू यांच्या मागणीला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.