Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhagan Bhujbal-Parth Pawar dispute: राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय; पार्थ पवारांच्या हस्तक्षेपावर छगन भुजबळ का भडकले?

Chhagan Bhujbal-Parth Pawar dispute: या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 30, 2026 | 02:11 PM
Chhagan Bhujbal,Parth Pawar, NCP Ajit Pawar, Maharashtra Politics,

Chhagan Bhujbal,Parth Pawar, NCP Ajit Pawar, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • अजित पवार गटातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागल्याचे चित्र
  • प्रशासन आणि टेंडर प्रक्रिया कशी चालते हे मला शिकवू नका- छगन भुजबळ
  • ६ महिन्यांचा हिशेब मागितल्याने नेते नाराज
NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागल्याचे चित्र आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यात एका शासकीय टेंडरवरून तीव्र वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. अन्नधान्य पुरवठ्याच्या कोट्यवधी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत एका विशिष्ट कंत्राटदाराला संधी देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याने हा वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, यासंदर्भात झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांनी संबंधित टेंडरबाबत आग्रह धरला. मात्र, अनुभवी नेते छगन भुजबळ यांनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप मान्य नसल्याचे स्पष्ट करत कठोर भूमिका घेतली. “प्रशासन आणि टेंडर प्रक्रिया कशी चालते हे मला शिकवू नका, अशा शब्दांत भुजबळ यांनी संताप व्यक्त केल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे बैठकीतील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

Devendra Fadnavis : “ओबीसींना घाबरण्याची गरज नाही आणि मराठा

६ महिन्यांचा हिशेब मागितल्याने नेते नाराज

गेल्या ६ महिन्यांपासून पार्थ पवार यांच्याकडून पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये आणि शासकीय कामांमध्ये वेगवेगळ्या पद्ध‌तीने हस्तक्षेप केला जात असल्याची तक्रार सातत्याने होत आहे. विशेष म्हणजे, पार्थ पवारांनी थेट मंत्र्यांकडेच गेल्या ६ महिन्यांत मंजूर झालेली टेंडर्स, वाटप झालेला निधी आणि विकासकामांची सविस्तर डेटा मागवला आहे. पक्षाची कोणतीही अधिकृत घटनात्मक जबाबदारी किवा शासकीय पद नसताना, केवळ दादांचे सुपुत्र म्हणून अशा प्रकारे बेट मंत्र्यांना जाब विचारल्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक ज्येष्ठ नेते नाराज आहेत.

पक्षाची बोलण्यास टाळाटाळ; विरोधकांच्या हाती कोलीत

या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र पडद्यामागे सुरू असलेल्या या धुसफुशीमुळे आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत, ज्यामुळे विरोधकांच्या हाती मोठे कोलीत सापडले आहे.

संपूर्ण प्रकरणावर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला, मात्र पडद्यामागे सुरू असलेल्या या धुसफुशीमुळे आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग; अर्थ किंवा महसूल खात्यासाठी वळसे पाटील यांचे नाव चर्चेत

भुजबळ-पार्थ पवारांमध्ये वाद नाही : उमेश पाटील

मंत्री छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यात वाद असल्याच्या चर्चाना अहितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी फेटाळून लावले, माध्यमांमध्ये सुत्रांच्या हवाले येणाऱ्या बातम्यांवर त्यानी नाराजी व्यक्त करत, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही. भुजबळ पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या तीन दिवसांपासून पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये पक्ष संघटनेच्या बैठका घेत असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र कोणतीही ठोस चर्चा नसताना नकारात्मक बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्येक बातमी सुत्रांच्या हवाले येत आहे.

 

Web Title: Chhagan bhujbal parth pawar dispute 2026 ncp ajit pawar faction internal rift

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • parth pawar

संबंधित बातम्या

Parth Pawar Engagement : पवार कुटुंबात पुन्हा एकदा शुभमंगल सावधान! पार्थ पवारांचा साखरपुडा ठरला, कोण आहेत भावी पत्नी?
1

Parth Pawar Engagement : पवार कुटुंबात पुन्हा एकदा शुभमंगल सावधान! पार्थ पवारांचा साखरपुडा ठरला, कोण आहेत भावी पत्नी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.