Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते म्हणजेच ते धर्मवीरही होते पण..’ जितेंद्र आव्हाडांची सारवासारव, औरंगजेब क्रूर असल्याचंही मान्य

आपल्या अंगावर आलं की दुसऱ्यावर ढकलून द्यायचं हे काम सुरु असल्याचंही आव्हाड म्हणाले. संभाजीराजेंना क्रूरपणे मारण्यात आलं. मात्र कोणत्या धर्मासाठी किंवा धर्माच्या प्रचारासाठी मृत्यू पत्करला हे अमान्य असल्याचं आव्हाड म्हणाले. जर संभाजीराजे इतके महान होते तर त्यांच्याबाबत सावरकर आणि गोळवलकरांनी असं का लिहिलं, याचं उत्तर त्यांना खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी द्यावं, असं आव्हानही त्यांनी दिलंय.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 03, 2023 | 03:17 PM
‘छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते म्हणजेच ते धर्मवीरही होते पण..’ जितेंद्र आव्हाडांची सारवासारव, औरंगजेब क्रूर असल्याचंही मान्य
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे- छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते म्हणजेच ते धर्मवीरही होते, मात्र ते एकट्या कुठल्या धर्मासाठी नव्हते, अशी सारवासारव राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. स्वराज्याचं रक्षण मरेपर्यंत संभाजीराजेंनी केलं, म्हणून त्यांना स्वराज्य रक्षक म्हणणं बरोबरच आहे. मात्र त्यांना एका कुठल्याही एका धर्माशी जोडणं अयोग्य असल्याचं आणि असा कुठलाही ऐतिहासिक उल्लेख नसल्याचं आव्हाड म्हणालेत. असा उल्लेख असता तर संभाजीराजेंना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रा. स्व. संघाचे सरसंघचालक गोळवलकर यांनी स्त्रीलंपट आणि दारुड्या असं म्हणण्याचं कारण नव्हतं, असंही आव्हाड म्हणालेत. हा दाखला इतिहासात त्यांच्या पुस्तकात आहे. आपल्या अंगावर आलं की दुसऱ्यावर ढकलून द्यायचं हे काम सुरु असल्याचंही आव्हाड म्हणाले. संभाजीराजेंना क्रूरपणे मारण्यात आलं. मात्र कोणत्या धर्मासाठी किंवा धर्माच्या प्रचारासाठी मृत्यू पत्करला हे अमान्य असल्याचं आव्हाड म्हणाले. जर संभाजीराजे इतके महान होते तर त्यांच्याबाबत सावरकर आणि गोळवलकरांनी असं का लिहिलं, याचं उत्तर त्यांना खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी द्यावं, असं आव्हानही त्यांनी दिलंय. या प्रश्नांचं उत्तर दिलं तर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारावेत, असंही आव्हाड म्हणालेत.

संभाजीराजे स्वराज्यरक्षक म्हणजेच धर्मवीर-आव्हाड
छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्यरक्षक होते म्हणजेच ते धर्मवीर होते. स्वराज्यात धर्म असतो, त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज लढले, झगडले. असंही आव्हाड म्हणालेत. ते ताठ मनाने औरंगजेबाला सामोरे गेल्याचंही आव्हाड म्हणाले. महाराष्ट्रानं त्या वेळी मराठा धर्म पाळला. संभाजीराजे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर होते , मात्र ते एका कुण्या धर्मासाठी होते, असं नाही, असं आव्हाड म्हणालेत.

औरंगजेब क्रूर होता, आव्हाडांचं घूमजाव

आरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेषा नव्हता, असं वक्तव्य काल आव्हाडांनी केलं होतं. त्यावर आज त्यांनी घूमजाव केलंय. औरंगजेब हा प्रचंड क्रूर होता. त्याने काकाला, भावाला त्यानं मारलं. बापाला तुरुंगात टाकलं. पण त्याच्यासमोर महाराष्ट्र, शिवाजी महाराज, संभाजी महाराज झुकले नाहीत. असंही आव्हाड म्हणाले. माध्यमांनी सोमवारी वक्तव्याचा विपर्यास केला असंही आव्हाड म्हणाले. आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

Web Title: Chhatrapati sambhaji raje would have been the protector of the self rule that means he would have been religious minded but

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2023 | 02:56 PM

Topics:  

  • BJP
  • jitendra avhad
  • Nationalist Congress Party
  • shivsena

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.