Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena News: “मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा…”, मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी

मुंबईत महाराष्ट्राच्या गृहनिर्माण खात्याकडून राबवण्यात आलेल्या समूह पुनर्विकास योजनेची (क्लस्टर रिडेवलपमेंट) देशभरात अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आज राज्यसभेत केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 02, 2026 | 06:29 PM
"मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा...", मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी

"मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा...", मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा
  • मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी
  • शाश्वत पुनर्विकासामुळे सामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळेल
नवी दिल्ली : मुंबईत महाराष्ट्राच्या गृहनिर्माण खात्याकडून राबवण्यात आलेल्या समूह पुनर्विकास योजनेची (क्लस्टर रिडेवलपमेंट) देशभरात अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आज राज्यसभेत केली. मुंबईतील क्लस्टर रिडेवलपमेंट ही शाश्वत पुनर्विकासाचे मॉडेल असून यातून देशातील कोट्यवधी गरिब नागरिकांना हक्काचे घर मिळेल, असा विश्वास खासदार देवरा यांनी व्यक्त केला.

मुंबईमध्ये यशस्वीपणे राबविण्यात येत असलेल्या परवडणाऱ्या गृहनिर्माणाद्वारे साध्य होणाऱ्या शाश्वत विकासाविषयी खासदार देवरा यांनी राज्यसभेत विचार मांडले. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. ही योजना देशभरात राबविली गेल्यास सामान्य आणि कष्टकरी नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळविण्यास मदत होईल, असा विश्वास खासदार देवरा यांनी व्यक्त केला.

मनुष्यबळ कमतरतेमुळे डासजन्य आजारांमध्ये वाढ! मंजूर २,२०० पदांपैकी सुमारे ४० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती

खासदार देवरा पुढे म्हणाले की, भारताची एक तृतीयांश लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे. शहरांचे देशाच्या ‘जीडीपी’मध्ये दोनतृतीयांश योगदान आहे. २०३० पर्यंत ते ‘जीडीपी’च्या तीन चतुर्थांश इतके होईल. शहरीणकरण भारतासाठी एक मोठी संधी आहे. राज्यघटनेतील सुधारणेनंतर महापालिकांना विकासाचे जादा अधिकार मिळाले. जागतिक पातळीवर अमेरिका, चीन या देशांमध्ये दोन शहरांमध्ये विकासासाची निकोप स्पर्धा असते. त्याप्रमाणे भारतातही राज्यांमधील स्पर्धेबरोबच शहरांमध्ये निकोप स्पर्धा होणे आवश्यक आहे. यासाठी सरकारच्या धोरणांमध्ये शहरी सुधारणा केंद्रस्थानी असायला हव्यात, असे खासदार देवरा म्हणाले. डिजिटल सेवा, कालबद्ध परवानग्या, विविध शुल्कांमध्ये पारदर्शकपणा यांचा अंतर्भाव असावा. जे शहरांमध्ये सुधारणा करतील त्यांचा गौरव व्हायला हवा, असेही ते म्हणाले.

यशस्वी शहरीकरणासाठी परवडणारी घरे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. यामध्ये विकासाच्या मोठ्या संधी आहेत, असे खासदार देवरा म्हणाले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगर ते कामाठीपुरा तसेच धारावी ते भेंडी बाजारपर्यंत क्लस्टर रिडेवलपमेंटच्या माध्यमातून गृहनिर्माण क्षेत्रात क्रांती होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्याचे गृहनिर्माण खाते झोपडपट्टी आणि चाळींमध्ये राहणाऱ्या हजारो वंचित नागरिकांना समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून त्याच ठिकाणी हक्काची सुसज्ज घरे देत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने १९९५ पासून आजतागायत अडीच लाख कुटुंबियांना त्यांच्या हक्काची घरे दिली आहेत. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने मुंबईच्या समूह पुनर्विकास योजनेचा अभ्यास करायला हवा. शाश्वत पुनर्विकासाचे मुंबई मॉडेल देशासाठी शाश्वत शहरी विकासातील महत्वाची भूमिका बजावेल. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्रालयाला याचे सादरणीकर करतील. ही योजना देशभरात राबविली गेल्यास सामान्य आणि कष्टकरी नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळविण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास खासदार देवरा यांनी व्यक्त केला.

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा अवकाळीचे सावट, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

Web Title: Implement the cluster redevelopment plan of mumbai across the country milind deora demand in rajya sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • Milind Deora
  • Mumbai
  • shivsena

संबंधित बातम्या

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
1

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप
2

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!
3

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!
4

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.