Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रशिक्षणाला २,०१६ कर्मचारी दांडीबहाद्दर! आयुक्त जी. श्रीकांत आक्रमक, गुन्हे दाखल करण्याचे आदेश

शहरातील विविध प्रभागांमध्ये ८,००० मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक कामकाजात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्व संबंधित अधिका-यांसाठी प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 29, 2025 | 02:43 PM
प्रशिक्षणाला २,०१६ कर्मचारी दांडीबहाद्दर! आयुक्त जी. श्रीकांत आक्रमक (Photo Credit - X)

प्रशिक्षणाला २,०१६ कर्मचारी दांडीबहाद्दर! आयुक्त जी. श्रीकांत आक्रमक (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • प्रशिक्षणाला २०१६ जणांनी मारली दांडी
  • गरज गुन्हे नोंदवण्याचे आयुक्तांचे आदेश
  • कारणे दाखवा नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Muncipal Election 2026: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया नियमानुसार, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. त्याच अनुषंगाने रविवारी दि.२८ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे अनिवार्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, मात्र या महत्त्वाच्या प्रशिक्षणाला तब्बल २,०१६ अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहिल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्य निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम जाहीर केला असून १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

बंधनकारक होते प्रशिक्षण

शहरातील विविध प्रभागांमध्ये ८,००० मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक कामकाजात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्व संबंधित अधिका-यांसाठी प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले होते. रविवारी सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रशिक्षण सत्रे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ ते ८ याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी १,००० अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले.

तपासणीनंतर सत्य उघड

चारही प्रशिक्षण केंद्रांवर उपस्थितीची तपासणी केल्यानंतर गैरहजेरी समोर आली. त्यामुळे आता या गैरहजर राहणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर संबंधित विभाग काय कारवाई करणार किंवा नुसते नोटिस बजावणार हे पहावे लागले.

हे देखील वाचा: Maharashtra Politics : नामांकन तोंडावर, युती अंधातरीच; भाजप-काँग्रेसची ‘मौन रणनीती’ मित्रपक्षांसाठी घातक

ईव्हीएम हाताळणीवर भर

प्रशिक्षणादरम्यान मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा, ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची हाताळणी, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, मतदान दिवशी घ्यावयाची खबरदारी तसेच आकस्मिक किंवा आपत्कालीन परिस्थितीत अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

गरज पडल्यास गुन्हे दाखल करा

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिलेल्या सर्व २,०१६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. कामकाजात कसलीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. प्रशिक्षणाला जाणीवपूर्वक गैरहजर राहणाऱ्यांवर गरज पडल्यास गुन्हे नोंदवा.

हे देखील वाचा: Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात

Web Title: 2016 people skipped the training the commissioner has ordered that cases be registered against them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याची अपहरण करून हत्या, कन्नड घाटात हातपाय बांधलेला अवस्थेत आढळला मृतदेह
1

Chhatrapati Sambhajinagar: 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याची अपहरण करून हत्या, कन्नड घाटात हातपाय बांधलेला अवस्थेत आढळला मृतदेह

आसडी येथे ७५ वर्षीय वृद्धेच्या घरातून ३ लाखांचे दागिने लंपास; अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल
2

आसडी येथे ७५ वर्षीय वृद्धेच्या घरातून ३ लाखांचे दागिने लंपास; अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल

Illegal Liquor Action: महिलांनी मांडली व्यथा, आ. अब्दुल सत्तार यांनी घेतली दखल! डीग्रसमध्ये दारू अड्डे बंद करण्याचे आदेश
3

Illegal Liquor Action: महिलांनी मांडली व्यथा, आ. अब्दुल सत्तार यांनी घेतली दखल! डीग्रसमध्ये दारू अड्डे बंद करण्याचे आदेश

Crime News: मौजमजेसाठी बनले मोबाइल चोर! जव्हारनगर पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या; १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Crime News: मौजमजेसाठी बनले मोबाइल चोर! जव्हारनगर पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या; १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.