Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भेदभाव संपला! जरंडी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम; ‘पहिली मुलगी’ म्हणजे ‘लक्ष्मी’, गाव करतो सन्मान

जरंडी गावाची ओळख आता 'मुलीच्या जन्माचे उत्साहाने स्वागत करणारे गाव' अशी तालुक्यात होऊ लागली आहे.  गावात एखाद्या कुटुंबात पहिली मुलगी जन्माला आल्यास, त्या कुटुंबाला ग्रामपंचायतीतर्फे ₹१५०० रोख रक्कम भेट म्हणून दिली जाते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 05, 2025 | 03:40 PM
भेदभाव संपला! जरंडी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम (Photo Credit - AI)

भेदभाव संपला! जरंडी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम (Photo Credit - AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • सोयगावचे आदर्श गाव जरंडी
  • ‘मुलगी जन्माचे स्वागत’ करणारी महाराष्ट्रातील अनोखी ग्रामपंचायत!
  • कन्यारत्नाच्या जन्मावर मिळते इतकी

सोयगाव (वा): आजही आपल्या समाजात मुलींना कमी लेखलं जात. समाजात आजही काही ठिकाणी मुलींबाबत भेदभाव केला जात असला तरी, सोयगाव तालुक्यातील जरंडी या गावाने ही मानसिकता कायमची बदलण्याचा निर्धार केला आहे. ‘मुलगाच हवा’ या विचाराला तिलांजली देत, मुलगा आणि मुलगी एकसमान आहेत हे सिद्ध करण्यासाठी जरंडी ग्रामपंचायतने गेल्या काही वर्षांपासून एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.

कन्यारत्नाच्या जन्मावर रोख १५०० रुपयांचे प्रोत्साहन

जरंडी गावाची ओळख आता ‘मुलीच्या जन्माचे उत्साहाने स्वागत करणारे गाव’ अशी तालुक्यात होऊ लागली आहे. गावात एखाद्या कुटुंबात पहिली मुलगी जन्माला आल्यास, त्या कुटुंबाला ग्रामपंचायतीतर्फे ₹१५०० रोख रक्कम भेट म्हणून दिली जाते. एवढेच नव्हे तर, मुलीच्या आई-वडिलांचा विशेष कार्यक्रम आयोजित करून जाहीर सत्कार केला जातो. यामुळे मुलीच्या जन्माचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण गाव त्यात सहभागी होते. हा उपक्रम ग्रामपंचायतचे सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, वंदनाताई पाटील, नीलिमा पवार आणि ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: नगरपरिषद निवडणुकीचा ‘धुरळा’; राजकीय ‘जुगाड’ आणि सत्तेच्या समीकरणांची जुळवाजुळव!

सामाजिक सलोखा आणि मदतीच्या अभिनव योजना

जरंडी ग्रामपंचायत केवळ कन्या जन्माचेच नाही, तर गावकऱ्यांत सामाजिक सलोखा आणि आपुलकीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी विविध लोकोपयोगी योजना राबवीत आहे. गावातील कुटुंबात व्यक्ती मृत पावल्यास तत्काळ मदत म्हणून ₹१५०० रोख रक्कम दिली जाते. गावातील मुलीचे लग्न झाल्यावर तिला माहेरची भेट म्हणून ₹११०० चा धनादेश देऊन तिचा सन्मान केला जातो. नवोदय आणि स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) परीक्षेत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीमार्फत ₹११०० रोख रक्कम आणि शालेय शैक्षणिक वस्तू भेट स्वरूपात देऊन त्यांचा सत्कार केला जातो.

सरपंच स्वाती पाटील म्हणताता, “मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव केला जाऊ नये, महिलांचा सन्मान व्हावा आणि गावातील सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, या उद्देशाने आम्ही नावीन्यपूर्ण योजना राबवत आहोत. गावाचा विकास आणि उत्थान करणे, हेच ग्रामपंचायतचे मुख्य ध्येय आहे.”

मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दोन कन्यारत्न मातांचा आणि ‘माहेर भेट’ योजनेअंतर्गत अकरा महिलांना ₹११०० च्या धनादेशांचे वाटप करून सत्कार करण्यात आला. अशा प्रकारे जरंडी ग्रामपंचायत लोकसहभाग आणि अभिनव योजनांच्या माध्यमातून गाव विकासाचा नवा आदर्श घालून देत आहे.

Chhatrapati Sambhajinagar News: मोबाईल क्रांतीचा फटका! छत्रपती संभाजीनगरमधील सिनेमागृहे ओस! अखेर शासनाने दिला ‘जीआर’चा आधार

Web Title: A commendable initiative of jarandi gram panchayat first daughter means lakshmi the village honors her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Women

संबंधित बातम्या

२५ वर्षे मोफत वीज! दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी महावितरणची ‘SMART’ योजना; काय आहे ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र’ स्कीम?
1

२५ वर्षे मोफत वीज! दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी महावितरणची ‘SMART’ योजना; काय आहे ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र’ स्कीम?

इंस्टाग्रामवर मैत्री, मग झालं प्रेमात रुपांतर; 4 मुलांची आई प्रेमीसोबत झाली फरार, पतीवर केले भयंकर आरोप म्हणाली… Video Viral
2

इंस्टाग्रामवर मैत्री, मग झालं प्रेमात रुपांतर; 4 मुलांची आई प्रेमीसोबत झाली फरार, पतीवर केले भयंकर आरोप म्हणाली… Video Viral

Chhatrapati Sambhajinagar: नगरपरिषद निवडणुकीचा ‘धुरळा’; राजकीय ‘जुगाड’ आणि सत्तेच्या समीकरणांची जुळवाजुळव!
3

Chhatrapati Sambhajinagar: नगरपरिषद निवडणुकीचा ‘धुरळा’; राजकीय ‘जुगाड’ आणि सत्तेच्या समीकरणांची जुळवाजुळव!

हात-पाय बांधले अन् लोखंडी तव्याने गतिमंद मुलाला…;  छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटनेचा Video Viral
4

हात-पाय बांधले अन् लोखंडी तव्याने गतिमंद मुलाला…; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.