Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्यटनाला नवी दिशा! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरे; सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ५ ठिकाणांचा शोध

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२ नवीन जिवंत झरे सापडले आहेत. सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ५ झरे असून, या ठिकाणांचा आता पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 08, 2026 | 03:46 PM
पर्यटनाला नवी दिशा! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरे (Photo Credit - X)

पर्यटनाला नवी दिशा! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरे (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • पर्यटनाला नवी दिशा!
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरे
  • सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ५ ठिकाणांचा शोध
Chhatrapati Sambhajinagar News: संभाजीनगर जिल्ह्यातील निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या गणनेत जिल्ह्यात १२ नवीन जिवंत झरे आढळून आले आहेत. यामध्ये सिल्लोड तालुक्याने बाजी मारली असून, येथे सर्वाधिक ५ झरे सापडले आहेत. या नैसर्गिक जलस्त्रोतांच्या ठिकाणी आता पर्यटन विकासासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा विशेष उपक्रम

देशातील पर्वतीय आणि डोंगराळ भागांतील जलसुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी केंद्रीय जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने झऱ्यांची गणना करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. नीती आयोगाच्या अहवालानुसार, देशातील १५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी अशा नैसर्गिक झऱ्यांवर अवलंबून आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही ही गणना पूर्ण करण्यात आली असून, जिल्ह्याला १२ नवीन जलस्त्रोत मिळाले आहेत.

कोठे आढळले हे जिवंत झरे?

जिल्ह्यातील चार प्रमुख तालुक्यांमध्ये या झऱ्यांचा शोध लागला आहे. त्याचे सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहेत:

सिल्लोड तालुका (सर्वाधिक ५ झरे): वडाळी (२), बाळापूर (१), पालोड (१) आणि पिंपळदरी (१).

कन्नड तालुका: भिलदरी गावात २ ठिकाणी जिवंत झरे आढळले आहेत.

खुलताबाद तालुका: वेरुळ येथे २, तर ममनापूर आणि कनकशीळ येथे प्रत्येकी १ झरा सापडला आहे.

फुलंब्री तालुका: मारसावळी येथे १ झरा आढळून आला आहे.

दहा वर्षे झाली तरी मराठवाडा सिंचनात ‘दुष्काळीच’! विदर्भातील ६८ प्रकल्प अद्यापही अपूर्ण; आर्थिक पाहणी अहवालातून सरकारची पोलखोल

ग्रामीण जलसुरक्षेसाठी झऱ्यांचे महत्त्व

डोंगराळ भागात असलेल्या अनेक वाड्या-वस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा झरा हा एकमेव नैसर्गिक स्रोत असतो. ग्रामीण समुदायाची घरगुती पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी या झऱ्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. आता प्रशासनाकडून या ठिकाणांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, पुढील टप्प्यात या झऱ्यांचे संवर्धन आणि त्या परिसराचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्याचे नियोजन केले जात आहे.

पर्यटन विकासाला मिळणार चालना

वेरुळ आणि सिल्लोडसारख्या भागात आधीच पर्यटकांची मोठी वर्दळ असते. आता या नवीन जिवंत झऱ्यांच्या शोधामुळे ‘इको-टुरिझम’ला (निसर्ग पर्यटन) अधिक वाव मिळणार आहे. या झऱ्यांच्या परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

संभाजीनगर महापालिका मालामाल! प्राणिसंग्रहालय आणि उद्यानांच्या उत्पन्नात मोठी वाढ; वर्षभरात ४.८५ कोटींची कमाई

Web Title: Chhatrapati sambhajinagar 12 live springs found sillod tourism development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • tourim

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले
1

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश
2

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख
3

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…
4

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.